बीड

निष्क्रिय पालकमंत्री अजितदादांचा राजीनामा लोकशाही मार्गाने निदर्शने करत मागणा-या आंदोलनकर्त्यांना पोलिस प्रशासनाने उचलले ; अजितदादांची टगेगिरी सहन करणार नाही :- डॉ.गणेश ढवळे 

निष्क्रिय पालकमंत्री अजितदादांचा राजीनामा लोकशाही मार्गाने निदर्शने करत मागणा-या आंदोलनकर्त्यांना पोलिस प्रशासनाने उचलले ; अजितदादांची टगेगिरी सहन करणार नाही :- डॉ.गणेश ढवळे
——-
 बीड:-(दि.१९ )मी एकेकाला सुतासारखं सरळ करीन अशा वल्गना करणा-या पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या बीड जिल्ह्यात टोळक्यांनी मारहाण करत व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण केली असुन कायदा व सुव्यवस्था बिघडली असुन ती राखण्यास पोलिस प्रशासन असमर्थ ठरत आहे.पोलिस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही आणि पालकमंत्री अजितदादा यांचे पोलिस खात्यावर नियंत्रण नाही नसल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यास असमर्थ, पवनचक्की कंपन्यांकडून महसूल व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने दडपशाही व खोटे खंडणीचे गुन्हे दाखल असताना शेतकऱ्यांना न्याय देण्यास असमर्थ उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य असुन तिजोरीच्या चाव्या हातात असताना बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदत वेळेवर देण्यासाठी असमर्थ तसेच बीड शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी महावितरणचे थकीत ३३ कोटी रुपये वीजबिल नियोजन अथवा वित्त विभागातुन देण्यास असमर्थ तसेच बीड जिल्ह्यातील जलजीवन योजनेंतर्गत कामांसाठी २५० कोटी निधीची आवश्यकता असताना केवळ १४ कोटी रुपये मंजूर करून ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यास असमर्थ बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बीडच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, पांडुरंग हराळे, बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले, आसाराम माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने निदर्शने करत असताना त्यांना पोलिस प्रशासनाने आंदोलन करत असताना पकडून पोलिसांच्या गाडीत टाकून शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये नेले आणि २ अडीच घंटे शिवाजीनगर पोलिस स्टेशनला बसवुन ठेऊन अजितदादा बीडमधून गेल्यानंतरच सोडून दिले.
अजितदादांची टगेगिरी बीड जिल्हा सहन करणार नाही ; लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी :- डॉ.गणेश ढवळे
—-
आज दि.१९ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय आणि शिवाजीनगर पोलिस स्टेशन यांना देऊन त्यांची आवक जावक घेतलेली आहे. तशा दैनिकात बातम्या १७,१८ तारखेला प्रसिद्ध झाल्या आहेत. आंदोलनकर्ते यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी केली नाही तसेच काळे झेंडे दाखवले नाही , अजितदादांची गाडी अडवली नाही. केवळ ५ आंदोलनकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. माझ्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार होते परंतु शुक्रवार पासुन ४ दिवस मी  डॉ.आनिल बारकुल यांच्या दवाखान्यात आयसीयु मध्ये अडमिट आहे. मला दररोज रक्त चढवावे लागत असल्याने चक्कर येऊ शकते म्हणून आंदोलनास जाण्यासाठी परवानगी दिली नाही म्हणून मी आंदोलनात सहभागी नव्हतो. परंतु लोकशाही मार्गाने आंदोलन करणारांची पोलिस प्रशासनाकडून मुस्कटदाबी आणि अजितदादांची टगेगिरी बीड जिल्हा सहन करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे लिंबागणेकर यांनी दिली आहे.
Back to top button