📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गड-किल्यांचे पावित्र्य भंग होऊ देऊ नका !

गड-किल्यांचे पावित्र्य भंग होऊ देऊ नका !

श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक व्रतवैकल्ये येतात. श्रावण महिन्याला जोडूनच भाद्रपदात गणपती तर अश्विन महिन्यात नवरात्री येतात. या अडीच-तीन महिन्यांत अनेक जण मांसाहार ग्रहण करत नाहीत. त्यामुळे श्रावण महिना सुरु होण्याआधी गटारी(खरे नाव गतहारी) साजरी करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांत पडली आहे. हा हिंदू धर्मातील कोणताही उत्सव किंवा सण नसला तरी दरवर्षी तो मांसाहारी जेवणावर आणि मद्यपानावर यथेच्छ ताव मारून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी कुठे जायचे याचे नियोजन तरुणवर्गाकडून १५ दिवस आधीपासूनच केले जाते. बऱ्याचदा ही कार्यक्रम करण्यासाठी एखादी निर्जन किंवा पुरातन जागा शोधली जाते. अनेकदा दुर्लक्षित असलेल्या पुरातन गडकिल्यांवर सुद्धा अशा पार्ट्या आयोजित केल्या जातात. आजमितीला काही हाताच्या बोटांवरील दुर्ग किल्ले सोडले, तर असे अनेक किल्ले आहेत ज्यांचा इतिहास आपणाला ठाऊकही नाही. असे असले तरी हे दुर्ग किल्ले म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे पुरावे आहेत. आपल्या एका पिढीने यासाठी आपले रक्त सांडले आहे, सर्व सुखांचा त्याग केला आहे ही बाब ध्यानात घ्यायला हवी. त्यामुळे त्याचे पावित्र्य जपणे, त्यांचा योग्य तो मान ठेवणे हे आपले आणि आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्यांचे अलिखित कर्तव्यच आहे. पार्ट्यांसाठी गड किल्यांची निवड करणाऱ्या इतरांनाही वेळीच रोखून त्यांचे प्रबोधन करा  !

– सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी 
Back to top button