📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

निवारा बालगृहाच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा सत्कार

निवारा बालगृहाच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा सत्कार

जामखेड प्रतिनिधी –दि.१५ जूनतालुक्यातील मोहा फाटा समता भूमी येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाच्या वतीने नुकतेच नूतन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा शाल, पुष्पगुच्छ व संस्थेचे माहितीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी निवारा बालगृहाचे संचालक बापूसाहेब ओव्हळ यांनी बालगृहाच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, या संस्थेत अनाथ, निराधार, ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर, शोषित व भटके समुहातील सुमारे ७५ मुलांचे पालन-पोषण करण्यात येते. त्यांनी चौधरी यांना आपल्या कुटुंबासह बालगृहास अवश्य भेट देण्याचे आवाहन केले.

या सत्काराप्रसंगी बालगृहाचे अधीक्षक वैजिनाथ केसकर, समन्वयक संतोष चव्हाण, राज शिंदे, आजिनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button