बीड

सांगता सभेला मोठी गर्दी! अहो राम शिंदे सर किती खोट बोलणार? आमदार रोहित पवार यांचा हल्लाबोल?

सांगता सभेला मोठी गर्दी! अहो राम शिंदे सर किती खोट बोलणार? आमदार रोहित पवार यांचा हल्लाबोल?

भाजपाने जामखेड च्या विकासाची खिचडी – नितीन बानगुडे पाटील

जामखेड प्रतिनिधी :
गुंडांच्या वाटेवर चालणारे हवेत की,जामखेड ला विकासाच्या वाटेवर नेणारे नगरसेवक हवे आहेत. एम आय डी सी उभारले तर जामखेड सुजलाम सुफलाम होईल, एक व्हाल तर विकासाकडे जाल, सर्व जातींच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा नेता आमदार रोहित पवार आहेत. संध्याताई शहाजी राळेभात व उमेदवारांना निवडून दिल्यास शहराला स्वच्छ पाणी, चांगले रस्ते आणि मुलांसाठी दर्जेदार शिक्षण मिळेल,भाजपाने जामखेड च्या विकासाची खिचडी केली आहे.अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या शहाजी राळेभात आणि नगरसेवक पदाचे २२ उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख,किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी, गोविंद पोलाड, आरपीआयचे सचिन खरात यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड.मयुर डोके, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, सुरेश भोसले, सुर्यकांत मोरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार जनशक्ती पक्ष,किसान युवा क्रांती संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‌ ‌यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, मी सामन्य परिवारातील लोकांना उमेदवारी दिली असून रामकृष्ण हरी,बसवा गुंडाना घरी.भाजपच्या उमेदवारांना निवडून दिल्यास “चौकाचौकात मटका आणि जुगार फोफावेल.या निवडणूकीची चर्चा महाराष्ट्रात नाही तर देशात आहे. हवेतले शब्द सोडून मुख्यमंत्री महोदयांनी जामखेड येथे विकासाची खोटी आश्वासने दिली.जामखेड नगर परिषदेचे शाॅपिंग काॅम्प्लेक्स, पिण्याच्या पाण्याची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. अहो राम शिंदे सर किती खोट बोलणार? हा जो सर्व विकास झाला आहे तो महाविकास आघाडी च्या काळातील आहे.राजकीय पटलावर कर्जत / जामखेड चे वजन महाराष्ट्रात वाढले आहे. या शहरात युवा पिढीची सत्ता, माता भगिनी ची सत्ता म्हणजे आपली सत्ता, महाविकास आघाडी ची सत्ता येणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना आ.पवार म्हणाले की, विकासासोबतच जामखेड शहरातील गुंडगिरी संपवण्यासाठी आणि आपल्या माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.भाजपाकडून आमच्या उमेदवाराच्या घरच्यावर झालेल्या हल्ल्याच्या उल्लेख करून “मतदान दिवशी पूर्ण दिवसभर शहरात असेन, मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे.असा इशारा भाजपाला दिला.त्यादृष्टीने सर्व जामखेडकर मतदार पाठीशी खंबीरपणे उभं राहून निवडून देतील, असा विश्वास आहे.

यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांनी विरोधकांना मिळालेला दोन क्रमांक आणि त्यांचा दोन नंबरचा माल, दोन्हींचा मेळ अगदीच जुळतो,सत्ता येणार म्हणून आमच्या उमेदवाराला निवडणूक आयोगाने सात क्रमांक दिला. देशाचं वाटोळं करून धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन करू नका. आमची खरी लढत भाजपाशी आहे.महिला आरक्षणासाठी कायदा करणारे शरद पवार साहेब असल्याने संध्याताई भाग्यवान आहेत,३ तारखेला नगराध्यक्ष ठरणार, ज्योतिषाची गरजच नाही! चिंता जो मणी देऊन पंजा उभा केला, त्याला आता चिखलातील कमळाची साथ आहे. त्यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे. शेवटी गंगाधरही शक्तिमान आहे!

Back to top button