बीड
समता सैनिक दल भरतीपूर्व नाव नोंदणी अभियानास प्रारंभ.

——————-
नांदेड, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तरच्या वतीने नांदेड शहरामध्ये समता सैनिक दल भरतीपूर्व नाव नोंदणी अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. प्रथमतः महामानवांना वंदन करून पूज्य भिक्खु शिरत्न थेरो यांनी त्रिशरण व पंचशील प्रदान केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे संरक्षण सचिव अमरसिंहजी ढाका उपस्थित होते. त्यांना समता सैनिक दालने सलामी दिली. मा.अमरसिंह ढाका यांनी मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभेचे कार्य घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रामध्ये प्रथमता असा अभिनव उपक्रम राबवणे अभिनंदनिय असल्याचे सांगितले. तसेच लाठी काठीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
प्रा. भाई राजेश ढवळे यांनी समता सैनिक दलाच्या व भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म चळवळीस बळ देण्याचे कार्य समाजाने करावे. तरुणांनी आणि लहान बालकांनी धम्म संस्कार अवगत करण्यासाठी प्रत्येक कुटुंबांनी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहर शाखेचे अध्यक्ष ईश्वरावर जोंधळे होते, सूत्र संचलक शहर शाखेचे सरचिटणीस रमेश कोकरे यांनी केले, प्रस्ताविक शहर शाखेचे संरक्षण उपाध्यक्ष सदाशिवराव हनुमंते यांनी केले. समता सैनिक दलात दाखल होऊन इच्छाधारी यांची नावे संरक्षण सचिव आदरणीय विजय पोपलवार आणि आनंदराव जोंधळे यांनी नोंदविली. आभार जिल्हा शाखेचे सरचिटणीस दामोदरजी सरकटे यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हा कोषाध्यक्ष आद. सुभाषराव नरवाडे, संघटक अद. रवीकिरण जोंधळे, आद.राजेश बिऱ्हाडे, आद. देवराव झगडे, जेष्ठ मार्गदर्शक कोकरे काका यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात मात्र आंबेडकर महिला मंडळाच्या अनेक पदाधिकारी व शहरातील उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक युवकांनी समता सैनिक दल भरती साठी नाव नोंदणी केली. लवकरच समता सैनिक दलाचे भव्य शिबिर नांदेड शहर शाखेच्या संरक्षण विभागामार्फत आयोजित करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखेचे पदाधिकारी मा.आनंदराव गायकवाड, मा. प्रा. एच.डी. बडेराव, मा.भीमराव कदम, निवृत्ती, मा. निवृत्ती लोणे, मा.प्रकाश जोंधळे, मा.अनिल लोणी, मा.श्रावण मेथेकर मा. सुभाष लोखंडे, मा.प्रकाश कदम यांनी परिश्रम घेतले.