बीड

मुंदडा समर्थकांनी नगरपरिषदेकडे मागितली विविध कामांची माहिती

मुंदडा समर्थकांनी नगरपरिषदेकडे मागितली विविध कामांची माहिती

राजकिशोर मोदी अडचणीत येण्याची शक्यता

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-नगरपरिषद निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असतांनाच माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या विरोधकांनी एकत्र येऊन मंगळवारी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांचेकडे नगरपरिषदेअंतर्गत यापूर्वी करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती मागितली आहे. सदरील माहितीमुळे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.

या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे व नगरपरिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख यांना मंगळवार, दि.१७ जुन रोजी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नगरपरीषदेच्या मिटींग हॉलमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष महादु मस्के, माजी उपनगराध्यक्ष दिलीप सांगळे, माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, भाजपचे शहराध्यक्ष व माजी सभापती संजय गंभीरे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन घेवून नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या मुलभूत प्रश्नासंदर्भात विस्तृत चर्चा केली. नागरीकांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांना सर्व मुलभुत सुविधा पुरविण्यात याव्यात व ज्या-ज्या प्रभागातील नाले, रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत ती तातडीने करण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाकडून मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या अडचणी वाढविणाऱ्या अनेक कामांची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मागण्यांमध्ये प्रामुख्याने १) मालमत्ता कर : अंबाजोगाई शहरातील सावरकर चौक ते मिनाताई ठाकरे चौक पर्यंत असलेल्या सर्व व्यावसायीक इमारतींना लावण्यात आलेल्या करांचे विवरणाबाबत माहिती देण्यात यावी., २) जयवंती नदी पात्रातील बांधकामा बाबत : अंबाजोगाई शहरातील ऐतीहासीक जयवंती नदीपात्रा लगत शासनाच्या नियमानुसार किती बांधकामे सुरू आहेत व त्याबाबत आपले कार्यालयाने दिलेल्या परवानग्या याबाबत माहिती देण्यात यावी., ३) अनाधिकृत नळ कनेक्शन बाबत : अंबाजोगाई शहराच्या हद्दी बाहेर न्यु व्हिजन इंग्लीश स्कुल यास देण्यात आलेल्या नळ जोडणी कधी करण्यात आली आहे, त्यास कधी परवानगी देण्यात आली आहे, आजतगायत एकुण किती नळपट्टी / कर झालेला आहे व किती वसुल करण्यात आलेला आहे याबाबत माहिती देण्यात यावी., ४) अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत व ओपन स्पेस मधील अतिक्रमीत दुकानांसंदर्भात माहिती मिळणे बाबत. मिनाताई ठाकरे चौकासमोरील नगरपरिषद मालकीची जागा व ओपन स्पेस. सदर बाजार भागातील मुकुंदराज शाळेच्या बाजुस असणाऱ्या नगरपरिषद मालकीच्या जागांमधील दुकानांबाबत., ५) नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेमधील दुकान भाडे/ वसुली/ परवानगी/करारनामा/ठराव बाबत : राज मेडिकल ते राजकमल हॉटेल यामधील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेमध्ये भाडेतत्वावर देण्यात आलेल्या व्यावसायीकांना किती भाडे आहे, भाडे वसुली व भाडे वाढ याबाबत अधिकृत माहीती देण्यात यावी, पोलीस स्टेशन समोरील न.प.मालकीचे व्यापारी संकुलात दोन दुकानांचा एक दुकान तयार करून याचा अनाधिकृत वापर करणाऱ्या व्यापा-यांची चौकशी करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, मिनाताई ठाकरे चौकासमोरील नगरपरिषद मालकीची दुकाने, राजीव गांधी चौक येथील नगरपरिषद मालकीची दुकाने, नगरपरिषद उद्यानासमोरील नगरपरिषद मालकीची दुकाने, मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहा समोरील दुकाने, या संदर्भातील माहिती देण्यात यावी., ६) छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, शिवाजी चौक येथील व्यापाऱ्यांकरिता असलेले स्वच्छतागृह बंद करून त्याठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत माहिती देण्यात यावी, ७) नगरपरिषदेच्या विद्युत विभागातील साल सन २०१५ ते २०२४ पर्यंत काढण्यात आलेल्या निविदा, बिले व देयकाची माहीती देण्यात यावी., ८) साल सन २०१५ ते २०२४ कालावधीत नगरपरिषदेमार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडी बाबत निविदा व देयके याबाबत माहिती., ९) गुरूवार पेठ येथील मुक बधीर विद्यालय व मोदी हाईट्स या इमारतीचे मालमत्ता कर उतारे, बांधकाम परवाना व कर वसुली तपशिल याबाबत माहीती देण्यात यावी., १०) राज हॉटेल, सहकार भवन व राज हॉटेल मागील मोकळ्या जागेत बांधलेल्या शेड बाबत बांधकाम परवानग्या, मालमत्ता कर याबाबत संपुर्ण माहिती., ११) साल सन २०११ ते २०२२ पर्यंत मुकुंदराज सांस्कृतीक सभागृहाचे दुरूस्तीच्या कामाची निविदा, कार्यादेश व अदा करण्यात आलेली देयके याबाबत संपुर्ण माहिती., १२) साल सन २०१५ ते २०२४ या काळातील पाणी पुरवठा, बांधकाम व भंडार विभागामार्फत अदा करण्यात आलेली देयके याबाबत संपुर्ण माहिती., १३) राजकीशोर मोदी यांच्या संत भगवानबाबा चौका लगत असलेल्या स्वतःच्या मालकीच्या शेतजमीनी मधील कोठ्यावर अनाधिकृत नळ कनेक्शनचा गैरवापर करत आहेत. यामुळे याची ही चौकशी करून कारवाई करण्यात यावी. उपरोक्त विषयी संपुर्ण अधिकृत तपशीलवार माहिती तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी व संबंधीत प्रकरणांची चौकशी करून दोषींवर त्वरीत कार्यवाही करावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर अर्जदार म्हणून ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, माजी नगराध्यक्ष महादु मस्के, माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम शेख रज्जाक, माजी उपनगराध्यक्ष दिलीप सांगळे, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, भाजपचे शहराध्यक्ष संजय गंभीरे, डॉ.निशिकांत पाचेगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंडित जोगदंड, माजी नगरसेवक प्रशांत आदनाक, बालाजी शेरेकर, अतुल कसबे, बाळा गायके, सचिन वाघमारे, राणा चव्हाण, कल्याण काळे, गौरव लामतुरे, अक्षय भुमकर, सचिन केंद्रे, इस्माईल पठाण, योगेश कडबाने, महादेव गव्हाणे, नागनाथ साबणे, शशिकांत गायकवाड, अजय राठोड, ऍड.अरविंद मोटेगावकर, शेख खलिल शेख जलील, सुनिल मस्के, अक्षय शिंदे व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Back to top button