बीड

हरिनाम सप्ताह सामाजिक एकतेचे संस्कार केंद्र – राजेंद्र मस्के

हरिनाम सप्ताह सामाजिक एकतेचे संस्कार केंद्र – राजेंद्र मस्के

बेलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

बीड प्रतिनिधी – प्रख्यात देवस्थान बेलेश्वर परिसरातील बेलगाव येथे बेलेश्वर संस्थान महंत महादेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व हभप तुकाराम महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.यावेळी राजेंद्र मस्के यांनी भक्तांना संबोधीत करताना संबोधीत केले.

अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा एक पवित्र सोहळा आहे.हरिनाम सप्ताहा दरम्यान घडणारे प्रभूचे नामस्मरण भजन, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून भक्तिरस अनुभवता येतो.नामस्मरणाने मनाला शांती मिळते, मानसीक तणाव दूर होण्यास मदत होते. ईश्वरावरील श्रद्धा वाढीस लागते. ईश्वरा पुढे सर्वजण समान असतात या भावनेतून अशा मंगलमय सोहळ्यात भेदभाव विसरून ईश्वर भक्त निरपेक्ष भावनेने सहभागी होतात. समाजामध्ये एकोपा, प्रेम आणि परस्परांत सहकार्य भावना निर्माण होते. ग्रामीण संस्कृतीत सप्ताहाला वेगळं महत्त्व आहे. गावो गावी होणारे अखंड हरिनाम सप्ताह सामाजिक एकतेचे संस्कार केंद्र व्हावेत अशी भावना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बेलगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह सांगता समारंभ प्रसंगी भाविक भक्तांना संबोधित करताना व्यक्त केली आहे.

प्रख्यात देवस्थान बेलेश्वर परिसरातील बेलगाव येथे बेलेश्वर संस्थान महंत महादेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व हभप तुकाराम महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.

यावेळी अश्विन शेळके, दिलीप शेळके, जाधव अशोक, अंकुश शेळके,बबन शेळके, सुखदेव कोळपे, महेश सावंत, कल्याण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button