मनोज पवार सर यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

मनोज पवार सर यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
अंमळनेर प्रतिनिधी दि १६- पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना सामूहिक प्रार्थना करून इफ्तार पार्टीचे अंमळनेर येथे ग्रामपंचायत कार्यालयच्या प्रांगणात मनोज पवार सर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या वेळी इफ्तार पार्टीत शेकडो हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते. या महिन्यातील अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते. रात्रभर जागल्यानंतरही शेकडो मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. अनेक मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
यावेळी अंमळनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी एस आय चव्हाण साहेब, बहिरवाळ साहेब , मनोज पवार सर, मेंबर पिनू पोकळे, शफिक शेठ इनामदार, शब्बीर बागवान ,सत्तार आत्तार,कादरभाई ताबोळी, इम्रान पठाण, हुसेन ताबोळी, शेख चाचा, अहमद पठाण, अहमद सय्यद, शोकत बागवान, सलमान आत्तार , मुन्ना सय्यद,सोमा पांगरे, मुरलीधर पवार, विक्रम पवार, ऋषीं पवार,अमीर इनामदार, मुबारक, अमन सय्यद, मोबीन बागवान, फिरोज बागवान, प्रशांत पवार, भागवत नवले, विठ्ठल नवले, अभिजित पथरूडकर, अनिल हडतगुणे,अण्णा पवार तसेच पाटोदा तालुका ग्रामीण पत्रकार संघ , पत्रकार बबन उकांडे, भाऊसाहेब पवार, चंद्रकांत पवार,शेखर पवार,विशाल पोकळे, अविराज पवार, नितीन पवार आदीजण उपस्थित होते.



