बीड

होटाळकरांना ‘महाराष्ट्र भूषण सन्मान २०२५’ पुरस्कार जाहीर; मुंबईत गौरव

होटाळकरांना ‘महाराष्ट्र भूषण सन्मान २०२५’ पुरस्कार जाहीर; मुंबईत गौरव
नायगाव/अरविंद शिंदे
  ग्रामीण भागात शिक्षण, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिवराज पाटील होटाळकर यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण सन्मान २०२५’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात येतो.
   रविवार दि. १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते होटाळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होटाळकर यांनी सातत्याने केलेल्या कार्याची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. शिक्षण, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली असून ग्रामीण विकासासाठी त्यांचे योगदान विशेष ठरले आहे.
   या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी भूषवले असून व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
======================
 _चौकट_
“हा सन्मान माझा एकट्याचा नसून ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात या ध्येयाने मी काम करत आलो आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून पुढील काळात शिक्षण, समाजकारण आणि ग्रामीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. — *शिवराज पा. होटाळकर*
Back to top button