बीड

साञा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

साञा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
(चौसाळा प्रतिनिधी:-बीड तालुक्यातील चौसाळा येथून जवळ असलेल्या साञा येथिल शेतकरी नवनाथ हरिबा काळे ( वय : 55) यांनी शेतातील सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळुन दिनांक 25 नोव्हेंबर मंगळवार रोजी पहाटे साडे पाच च्या दरम्यान स्वतःच्या शेतात चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सदरील  शेतकऱ्याला चार एकर कोरडवाहू जमीन आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी यामुळे शेतामध्ये नापिकी झाली. शेतामधून कुठलेच उत्पन्न मिळणार नसल्याने अगोदरच डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून  शेतकरी नवनाथ हरिबा काळे यांनी आत्महत्या केली असल्याची माहीती मिळाली आहे त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Back to top button