बीड
दिघोरी राधेश्वर नगर येथील सिमेंट रस्ते खोदकाम थांबवा अन्यथा आंदोलन छावा संघटना

दिघोरी राधेश्वर नगर येथील सिमेंट रस्ते खोदकाम थांबवा अन्यथा आंदोलन छावा संघटना
दिघोरी राधेशर नगर उमरेड रोड नागपूर येथे सिमेंट रस्ते व ड्रेनेज लाईन खोदकाम पावसाळ्यात थांबविण्यात यावे माननीय उच्च न्यायालय चे आदेश असून तसेच माननीय आयुक्त नागपूर महानगरपालिका यांचे सुद्धा आदेश असून पावसाळ्यामध्ये सिमेंट रोड ड्रेनेज लाईन खोदकाम कोणत्याही प्रकारचे करू नये जेणेकरून नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्रास होईल तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्रास होईल परंतु ठेकेदार आणि माजी नगरसेवक पिंटू झलके यांच्या आदेशाने काम सुरू करण्यात आले परंतु परिसरातील सर्व नागरिकांनी विरोध दर्शविला असून काम थांबविण्यात आले नाही तरी ते खोदकाम पावसाळ्यात थांबविण्यात यावे पावसाळा संपला की सप्टेंबर महिन्यामध्ये काम सुरू करण्यात यावे असे नागरिकांनी सांगितले परंतु ठेकेदार व माजी नगरसेवक ऐकायला तयार नाहीत जर काही पावसाळ्यात चिखल होऊन ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी तसेच सर्वसामान्य माणूस पाय घसून पडेल तर जबाबदार कोण? ठेकेदार की माजी नगरसेवक नागरिकांच्या विकास कामांना विरोध नाही परंतु पावसाळ्यात हे ठेकेदार मुद्दाम काम करतात याला विरोध आहेत जर सिमेंट रस्ते व ड्रेनेज लाईन खोदकाम जर बंद करण्यात येत नसेल तर तीव्र जन आंदोलन करू असे उमेश घाडगे छावा मराठा युवा संघटना नागपूर जिल्हा अध्यक्ष व विदर्भ प्रमुख यांनी पत्रकाद्वारे कळविले आहेत



