गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत पार पाडावेत – प्रशासनाचे निर्देश

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत पार पाडावेत – प्रशासनाचे निर्देश
मंडळाने २४ तास स्वयंसेवक, मिरवणुकीसाठी वेळेचे काटेकोर पालन आवश्यक
जामखेड प्रतिनिधी – जामखेड तहसील कार्यालयात श्री गणेश उत्सव २०२५ व ईद-ए-मिलाद अनुषंगाने शांतता समितीची बैठक कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी पार पडली. या बैठकीस कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे,पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, महावितरण चे प्रदीप कटकधोंड तसेच जामखेड नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक संभाजी कोकाटे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे बोलताना म्हणाले की,डि.जे.वाद्यावर बंदी असल्याने डि.जे.न वाजवता पारंपरिक वाद्यांचा गणेश मिरवणुकीत वापर करावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की,कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुशासन भंग होऊ नये याची दक्षता घ्यावी.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, शिवसेना तालुकाप्रमुख प्राध्यापक कैलास माने, हज कमिटी सदस्य सलीम बागवान,मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार,प्राचार्य विकी घायतडक,प्रहार जनशक्ती पक्षाचे नय्युमभाई सुभेदार, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, मंगेश आजबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष वसीम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, पांडुरंग भोसले,अभिजीत राळेभात, ऋषिकेश मोरे,पोलीस पाटील बिभिषण यादव, सिध्देश्वर पवार, निलेश वाघ, तुकाराम डोंगरे, महादेव वराट, दत्तात्रय निगुडे,अमोल गायकवाड, संतोष डिसले,योगेश जायभाय, अनिल लोहकरे,शरद माने, अभिजीत माने,शिवाजी येवले, महेश सोनवणे, बाबासाहेब निमोणकर, अनिल पाटील, ॲड.घनश्याम राळेभात, ऋषिकेश खरात, पंकज डोळस,अविराज पोकळे, महादेव बहीर आदी सामाजिक पदाधिकारी, पोलीस पाटील, गणेश मूर्तिकार,डी.जे. चालक, मंडप मालक, गणेश मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने यावेळी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत पार पडावेत यासाठी अनेक सूचना केल्या. सर्व मंडळांनी आवश्यक ती ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक असून कोणतेही मंडळ रस्त्यावर उभारले जाणार नाहीत, विसर्जन मिरवणुकीसाठी निश्चित वेळेचे पालन करणे गरजेचे आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले. गणेश मंडपांवर सीसीटीव्ही बसविणे, तात्पुरते वीज कनेक्शन घेणे, लाईट ची पुरेशी सोय करून पर्यायाने जनरेटरची व्यवस्था ठेवणे, मंडपांवर २४ तास स्वयंसेवक नेमणे, विसर्जनावेळी वाहन व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे आणि रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान लाऊडस्पीकर न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी शांतता समिती सदस्य व मंडळ प्रतिनिधींनीही काही मागण्या मांडल्या. मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, मुख्य पेठेतील खाली आलेल्या तारांची दुरुस्ती करावी, खर्डा चौक ते बीड कॉर्नर या मार्गावर बोर्ड लावू नयेत तसेच विसर्जन स्थळ म्हणून नाना – नानी पार्कमधील विहीर निश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. सुमारे १०० ते १२० नागरिकांच्या उपस्थितीत बैठक शांततेत व उत्साही वातावरणात पार पडली.
शांतता कमिटी बैठकीचे नियोजन गोपीनीय विभागाचे पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश जाधव यांच्या वतीने करण्यात आले.या बैठकीसाठी वाहतूक शाखेचे पोलीस काॅन्स्टेबल दिनेश गंगे, काॅन्स्टेबल देविदास पळसे,होमगार्ड रफीक तांबोळी,आकाश पटेकर आदींचे सहकार्य लाभले.



