विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक व शिक्षकांचा मोठा वाटा – आकाश बाफना

विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक व शिक्षकांचा मोठा वाटा – आकाश बाफना
मिशन आरंभ व प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे घवघवीत यश
जामखेड प्रतिनिधी – जामखेड शहरातील ऐतिहासिक असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी मुले व मुली या शाळेमध्ये नुकताच विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना बोलताना म्हणाले की, आज विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश हे कौतुकास्पद आहे. परंतु यामध्ये विद्यार्थ्यांचे आई वडील त्याच बरोबर शिक्षकांचाही खूप मोठा वाटा आहे. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या याच शाळेमध्ये आमचे सुद्धा शिक्षण झाले आहे. शाळेशी आमचं नातं भावना जुळलेल्या आहेत. आज या शाळेत अगदी प्रतीकुल परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
केंद्र प्रमुख राम निकम यांनी मिशन आरंभ या स्पर्धा परीक्षेची पार्श्वभूमी समजावून सांगितली व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात कोठेही मागे राहू नये, ही भूमिका जिल्हा परिषद अहिल्यानगरची असल्याचे त्यांनी सांगितले. खालील प्रमाणे यशस्वी विद्यार्थी जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
मिशन आरंभ निकाल सन 2024-25
🔹 जिल्हा गुणवत्ता यादी मधील प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी – 1. संकेत नारायण गीते – 4 थी, 2. स्वराज विलास मोरे – 4 थी.
🔹 तालुका स्तर गुणवत्ता यादीमध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी – 1. आरुष संजीवन रायकर – 4 थी, 2. अंश बाळकृष्ण जरे – 4 थी, 3. विराज महेंद्र लव्हाळे – 4 थी, 4. आदित्य संदीप धाउड – 4 थी, 5. आदित्य अनिल काळे – 4 थी.
इतर प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी – 1. श्लोक ब्रह्मदेव हजारे – 1 ली, 2. कार्तिक नितीन भोरे – 1 ली, 3. अद्वय मनोज भोसेकर – 1 ली, 4. हर्ष सचिन जाधव – 1 ली, 5. अभी गणेश कापरे – 1 ली, 6. सारंग संपत सुळे – 2 री, 7. सार्थक दत्ता वीर – 2 री, 8. श्रेयश खंडेराव राऊत – 2 री, 9. श्रीराज सचिन शिंदे – 2 री, 10. अभिनव गोविंद साठे – 2 री, 11. प्रसाद राजेंद्र वनवे – 3 री, 12. सत्यजित सागर माकुडे – 3 री, 13. श्रेयश मारुती सुळे – 3 री.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्राफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख राम निकम, आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना, विनायक राऊत, शाळा व्यवस्थापन समिती मुले शाळेचे अध्यक्ष नासीर सय्यद, मुलींच्या शाळेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी राळेभात, उपाध्यक्ष निलेश गायकवाड सर, मुले शाळेचे मुख्याध्यापक संजय कर्डीले व मुलींचे मुख्याध्यापक दत्तात्रय यादव, विलास मोरे, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर माकुडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संजय कर्डीले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्पना साबळे, अंबादास जोगदंड, कल्पना मोरे, सोनाली जोरे आदींनी विशेष परीश्रम घेतले.



