बीड
महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल बीडमध्ये जल्लोष

महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल बीडमध्ये जल्लोष
भाजप जिल्हा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंदोत्सव
बीड (प्रतिनिधी)
दि.१६ : भाजपने मुंबई, पुणे, पिंपरी -चिंचवडसह महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांवर झेंडा फडकावत मोठे व ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नावाच्या जोरदार घोषणा देत विजयाचा उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, “हा विजय म्हणजे भाजपच्या विकासाभिमुख नेतृत्वावर तसेच लोककल्याणकारी धोरणांवर जनतेने टाकलेली ठाम विश्वासाची मोहर आहे.” याच कार्यक्रमात अखिल भारतीय विमुक्त घुमंतू जनजाती महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.लक्ष्मण जाधव आणि भाजपचे नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य गोविंद शिराळे यांचेही अभिनंदन केले.
याप्रसंगी भाजपा बीड नगरपरिषद गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, रविंद्र कदम, अजय सवाई, विक्रांत हजारी, सुंदर चव्हाण, गणेश लांडे, संग्राम बांगर, शांतीनाथ डोरले, डॉ.अभय वनवे, दत्ता गायकवाड, राजू शहाणे, महादेव नागरगोजे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



