📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एकता नगर, पेठ बीड येथे भव्य-दिव्य रॅली उत्साहात संपन्न!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एकता नगर, पेठ बीड येथे भव्य-दिव्य रॅली उत्साहात संपन्न!
पप्पूजी कागदे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीचा शुभारंभ
बीड / प्रतिनिधी : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी एकता नगर, पेठ, बीड येथे भव्य-दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष माननीय पप्पूजी कागदे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅलीला उत्साहात सुरुवात झाली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व अधोरेखित करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या रॅलीप्रसंगी नगरसेवक राकेश अण्णा जाधव, समाजसेविका संगीता वाघमारे, अविनाश जोगदंड, बंडू निसर्गद, कालू बेग, अशोक गातडे, रतन शिरसाट, महादेव शेटे, कल्याण डोंगरे, गौतम धनवे आणि सुशील काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पप्पू वाघमारे मित्र मंडळाचा पुढाकार
या भव्य रॅलीचे आयोजन एकता नगर, पेठ, बीड आणि पप्पू वाघमारे मित्र मंडळ, बीड शहर यांच्या वतीने करण्यात आले होते. रॅलीच्या यशस्वितेसाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
रॅलीच्या आयोजनासाठी पुढाकार घेणारे कार्यकर्ते : नागेश वीर, नितीन सोनकांबळे, रिंकल वाघमारे, विकास शिंदे, प्रताप धन्वे.अविनाश जाधव.सचिन गव्हाणे.गणेश वाघमारे. जीतू धनवे, राजू वीर, सुनील राठोड, अमोल धनवे, दीपक ससाने, कपिल इनकर, भूषण काकडे, बाळू धनवे, बाबू इनकर, लखन परदेशी, शुभम पाखरे, सोनू साळुंखे, विशाल मिसळे, सचिन साळवे, विनोद कपाळे, विशाल खळगे, चेतन ढाकणे, सागर सोनवणे, बाबू जाधव, रोहित काळे, कैलास ठोकळ, विशाल मस्के, सनी कांबळे, नागसेन ओव्हाळ, पप्पू चव्हाण, शेख शफिक, कालिदास ओव्हाळ, रवी डोंगरे आणि अनुरथ खळगे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित या रॅलीच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. आयोजकांनी सर्व सहभागी नागरिक, मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
आयोजक : एकता नगर, पेठ, बीड व पप्पू वाघमारे मित्र मंडळ, बीड शहर.

Back to top button