📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जि.प.प्राथमिक केंद्र शाळा पाटोदा (ग.) येथे शिवजयंती उत्साहात

जि.प.प्राथमिक केंद्र शाळा पाटोदा (ग.) येथे शिवजयंती उत्साहात

ग्रामसेवकांकडून शाळेच्या उपक्रमांचे कौतुक

जामखेड : तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील जि.प.प्राथमिक केंद्र शाळेत आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने
साजरी करण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी शाळा परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांनी भाषणे आणि नृत्य सादर करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालक तसेच ग्रामस्थ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इयत्ता चौथीतील समर्थ जोनगहू या विद्यार्थ्याने छत्रपती शिवरायांची वेशभूषा साकारत ‘मी शिवाजी बोलतोय’ या विषयावर प्रभावी मनोगत व्यक्त केले. त्याच्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी ग्रामसेवक प्रशांत सातपुते यांनी शाळेच्या कार्याचे कौतुक करत रोख बक्षीस जाहीर केले.भविष्यातही शाळेला भक्कम पाठबळ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम पवार यांनी केले. विद्यार्थ्यांचा दर्जेदार कार्यक्रम उभारल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती रासने, जितेंद्र आढाव व संतोष डोके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अष्टेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जितेंद्र आढाव यांनी मानले.

Back to top button