बीड
सदगुरू किसान महाराज यांच्या चरणावर विश्वास ठेवला की उद्धार होतो – श्री ह भ प नाना महाराज कदम

सदगुरू किसान महाराज यांच्या चरणावर विश्वास ठेवला की उद्धार होतो – श्री ह भ प नाना महाराज कदम
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर दर्शनासाठी गर्दी
बीड – ( प्रतिनिधी) श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी आणि सदगुरू किसान महाराज यांच्या समाधीवर विश्वास ठेवल्या सामान्य जीवाचा उद्धार होतो. असे प्रतिपादन श्री ह भ प नाना महाराज कदम यांनी केले. श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर पौर्णिमेनिमित्त कीर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत नवनाथ महाराज , श्री . ह.भ.प सुरेश महाराज जाधव, श्री ह भ प अरुण नाना डाके, श्री ह भ प अनिल महाराज कासकर, पांडुरंग महाराज शिंदे, वासुदेव महाराज सुरवसे, रघुनाथ महाराज डोंगरे, सचिन महाराज थापडे, लक्ष्मीकात महाराज कदम, अनिकेत महाराज लांडे, श्रीरंग महाराज घुमरे, रुस्तुम महाराज इंगोले यांच्यासह हजारो भावी भक्तांचे उपस्थिती होती.
बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे हुताशनी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार श्री ह भ प नाना महाराज कदम यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या
संतांचिया पायी हा माझा विश्वास । सर्वभावे दास झालो त्यांचा ।।
तेचि माझे हित करिती सकळ । जेणे हा गोपाळ कृपा करी ।।
भागलिया मज वाहतील कडिये । त्यांचियाने जोडे सर्वसुख ।।
तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडी बोलिले ते ।।
या अभंगावर चिंतन मांडले. श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे संत किसन बाबा आणि नवनाथ बाबा यांच्या चरणावर विश्वास ठेवला तर आपल्या जीवाचं कल्याण होतं. संतांच्या आशीर्वादाशिवाय देवाची प्राप्ती ही होत नाही.. संत संतांच्या पायावरती विश्वास ठेवतील यात नवल नाही तर राक्षस सुद्धा संतांवरती विश्वास ठेवतात. त्यामुळे सामान्य जीवाने हे संतांच्या विचारावरती संतांच्या कृती वरती विश्वास ठेवून भजन भक्ती केली पाहिजे. सामान्य जीवनामध्ये सुद्धा विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीने प्रत्येकाने वागावे.
भक्तीच्या खडतर मार्गावर चालताना वा मार्गक्रमण करताना मी जर थकलो, भागलों तर तेच मला उचलून एखाद्या माउलीप्रमाणे कडेवर घेतील, मला काय हवे नको ते पाहतील व त्यांच्या ह्याच दयाळूपणामुळे मला सर्वसुखाची प्राप्ती होईल, माझ्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील. तुकोबाराय शेवटी म्हणतात एवढेच नव्हे तर अशा या संतमंडळींचे शेष(उच्छिष्ट) देखील मी आवडीने सेवन करिन आणि त्यांच्या मुखातून जे काही शद्ब बाहेर पडतील त्यातील एकही शद्ब मी खाली पडू देणार नाही आणि त्यांचे एकही वचन मोडणार नाही. माझा भावार्थ नाना महाराज कदम यांनी केला यावेळी व्यवहारातील वेगवेगळी उदाहरणे देखील दिले. काय वाचा आणि मनाने सेवा केली पाहिजे. परमभाग्याने संत आपल्या जीवनामध्ये मिळतात पूर्व संतांची भेट होते..असेही महाराजांनी सांगितले.
कीर्तनानंतर गावकरी मंडळी ढेकणमोहागावच्या वतीने उपस्थित सर्व भक्त मंडळींना महाप्रसादाची पंगत देण्यात आली..



