📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

माजी आ.भीमराव धोंडे यांच्या पुढाकारातून आष्टी तालुक्यातील अनेक संस्था चालकांचे उपस्थितीमध्ये पदवीधरांचा मेळावा संपन्न 

माजी आ.भीमराव धोंडे यांच्या पुढाकारातून आष्टी तालुक्यातील अनेक संस्था चालकांचे उपस्थितीमध्ये पदवीधरांचा मेळावा संपन्न
—————-
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा
— माजी आ.भीमराव धोंडे
————
 आ.सतीश चव्हाण पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व
— माजी आ.बाळासाहेब आजबे
————
शिक्षकांची जुनी पेन्शन, ग्रामीण शिक्षण आणि पदवीधरांच्या रोजगारासाठी प्रभावी प्रतिनिधित्वाची गरज
—————–
फोटो
—————–
आष्टी (प्रतिनिधी)  शिक्षकांची जुनी पेन्शन योजना,ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे संरक्षण, पदवीधरांसाठी रोजगारनिर्मिती आणि उद्योग-व्यवसायासाठी आर्थिक मदत या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज आहे. पदवीधरांच्या विविध समस्या विधानपरिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन लोकनेते, शिक्षणमहर्षी तथा माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप आणि शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित पदवीधर मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
  यावेळी विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक आणि पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. भीमरावजी धोंडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी प्रभावी शैक्षणिक धोरण राबविणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या ही चिंतेची बाब असून, या शाळा टिकविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी राबविलेल्या धोरणांचा संदर्भ देत खेड्यापाड्यांतील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावणे, पदवीधरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि औद्योगिकीकरणाला चालना देणे आवश्यक आहे. पदवीधरांनी उद्योग-व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे, यासाठी शासनाने आर्थिक मदत व अनुदान उपलब्ध करून द्यावे. शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगारासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी रोजगारनिर्मितीच्या प्रभावी योजना राबविणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून त्यामध्ये ७६ तालुक्यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघातील पदवीधरांचे प्रश्न समजून घेऊन ते सभागृहात मांडणे महत्त्वाचे आहे. सतीश चव्हाण यांचा विविध घटकांशी संपर्क असून त्यांनी यापूर्वीही शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविला आहे, असे धोंडे यांनी नमूद केले.यावेळी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे, लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.हनुमंत थोरवे,
 तंजूमे तरक्की शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा
 माजी शिक्षण सभापती नियामत बेग, अमोलक जैन संस्थेचे  उपाध्यक्ष बाबूशेठ भंडारी आणि माजी आ. बाळासाहेब काका आजबे यांचे भाषण झाले. माजी आ. आजबे यावेळी म्हणाले की, ग्रामीण शिक्षणव्यवस्थेचे संरक्षण, शिक्षकांची जुनी पेन्शन योजना, शैक्षणिक संस्थांचे प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण आणि पदवीधरांच्या रोजगाराच्या संधी यावर मत मांडले.
कार्यक्रमास महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा सिनेट सदस्य डॉ. अजयदादा धोंडे, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अभयराजे धोंडे, हरिभाऊ दहतोंडे, बजरंग कर्डिले, उत्तम बोडखे, संतोषभैय्या चव्हाण, सूरज चव्हाण, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, प्राचार्य रविकांत सुंबरे, प्राचार्य शिवदास विधाते, माऊली बोडखे, डॉ. सागर वाघुले,संदीप नन्नवरे, परत जाऊ डॉ. जी.पी.बोडखे, प्राध्यापक डॉ.बापू खैरे, प्राचार्य डॉ.शंभू वाघुले, प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ, प्राचार्य डॉ. साईनाथ मोहोळकर,प्राचार्य डॉ. बाळासाहेब खेमगर प्राचार्य संजय बोडखे, प्राचार्य सुनील कोल्हे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत गोसावी, उपप्राचार्य संजय धोंडे, प्राचार्य दादासाहेब काळे, मुख्याध्यापक साईनाथ बोडखे, प्रा.डॉ. विनोद ढोबळे, सभापती गौतम सावंत यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, कर्मचारी आणि पदवीधर मतदार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संभाजी ओव्हाळ  प्रास्ताविक डॉ. दत्ता नरसाळे  यांनी केले तर आभार प्रा.डॉ. रघुनाथ विधाते यांनी मानले.
Back to top button