बीड
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडच्या वतीने ‘‘कायदेविशय जनजागृती’’ या विशयावर जनजागृती शिबीर संपन्न…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडच्या वतीने ‘‘कायदेविशय जनजागृती’’
या विशयावर जनजागृती शिबीर संपन्न…
बीड – कान्हेगाव ग्रामपंचायत पिंपळवाडी ता. जि. बीड येथे कायदेविशय जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. किमान समान कार्यक्रम दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी कान्हेगाव येथील वस्तीवर कायदेविशयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रम मा. श्री. आनंद एल. यावलकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष साहेब बीड तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्षना खाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ. वहाब ए. सय्यद, मा. न्यायाधीष श्री. षुभम कराळे, मा. न्यायाधीष मुंजारीन जेलर, तसेच. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक श्री. एस. टी. षिंदे यांची सदर कार्यक्रमास उपस्थिती होती. तसेच अधिकार मित्र मिथुन जोगदंड, अधिकार मित्र मुकूंद उबाळे आणि गावचे सरपंच तसेच गावंकरी मोठया संख्येन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्षक डाॅ. वहाब ए. सय्यद यांनी आपल्या भाशणात सांगितले की, रणरणत्या उन्हात रस्त्याची पाहणी केल्यानंतर जाणवले आज या वस्तीवर येताना मला इथल्या चिमुकल्यांना दररोज किती कश्टाचा सामना करावा लागतो. उन्हाळयात पाण्यासाठी होणारी बणवण आणि षाळेपर्यंत पोहोचण्यासाठी साधा रस्ता नसणे, ही बाब आजच्या प्रगत काळात क्लेषदायक आहे. कायद्याच्या दृश्टीने प्रत्येक बालकाला सुरक्षीत वातावरणात षिक्षण मिळणे हा त्या मुलभूत अधिकार आहे आणि तो मिळवूण देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. षाळेची सुरक्षितता (संरक्षक भिंत) हे प्रष्न तातडीने सुटणे गरजेचे आहे. ‘‘विद्याथ्र्यांना षिक्षण मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. जर रस्ता, पाणी आणि सुरक्षेअभावी षिक्षणात अडथळे येत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. आम्ही स्वताः या समस्येचा पाठपूरावा संबंधीत कार्यालयांकडे करू. कायदा हा सर्व सामान्यासाठी आहे. आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ही तुमची हक्काची जागा आहे कोणत्याही अन्यायाविरूध्द किंवा सुविधेच्या अभावाविरूध्द तक्रार करण्यास घाबरू नका.’’ षाळा ही भविश्यातील आदर्ष पिढी घडवण्याचे केंद्र आहे. षिक्षण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड मार्फत मोफत कायदेविशयक सुविधा तसेच आज जरी या वस्तीवर पाण्यासाठी वणवण करावी लागत असली किंवा षाळेसाठी पायपीट करावी लागत असली, विद्यूत विजे अभावी अंधारात राहावे लागत असेल तरी लवकरच येथे विज, पाणी, रस्ता आरोग्य केंद्र, पोलिस चैकी, स्वच्छता गृह मिळतील, आता कोण्याही विद्याथ्र्याला सोयीसुविधांअभावी षिक्षण सोडावे लागणार नाही असा मला ठाम विष्वास आहे. गावकÚयांना धीर देताना ते पुढे म्हणाले, ‘‘ न्यायालय आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठीच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यरत आहे.न्यायव्यवस्थेचा मुख्य उद्देष केवळ निकाल देणे नसून समाजातील षेवटच्या घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण हा आहे. या महत्वपूर्ण विशयावर मार्गदर्षनपर भाशणात त्यांनी सांगितले. तसेच षिक्षणाचे महत्व या वेळी पटवून दिले.
कार्यक्रमाचे मार्गदर्षक मा. न्यायाधीष श्री. षुभम कराळे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची निर्मितीच यासाठी झाली आहे की, समाजातील गरीब, दुर्बल आणि षेवटच्या घटकातील व्यक्ती केवळ पैषा अभावी किंवा माहिती अभावी न्यायापासून वंचित राहू नये. विधी सेवा प्राधिकरण हे सामान्य नागरिक आणि षासन यांच्यातील एक भक्कम दुवा आहे. ‘‘आरोग्य षिक्षण आणि षुध्द पिण्याचे पाणी प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. षाळेत मुलभूत सुविधा पुरवणे ही षासनाची कायदेषीर जबाबदारी आहे. गावकÚयांना स्वताःला एकटे समजू नये. कायदेषीर साक्षरता हीच तुमची खरी षक्ती आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा मिळवण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेषीर तरतुदी यावर सविस्तर मार्गदर्षन केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्षक मा. न्यायाधीष मुंजारीन जेलर यांनी सांगितले की, अनेकदा लोकांना वाटते की न्यायालयीन प्रक्रिया खर्चीक आणि वेळखाऊ आहे. परंतु जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत मिळणारी मदत ही पुर्णपणे मोफत आहे. महिलांनविशयक कायदे आणि लोकअदालत तसेच मध्यस्थी या सरकारी विभागांषी संबंधीत प्रष्न समोपचाराने आणि कायदेषीर मार्गाने कसे सोडवतात याचे सविस्तर मार्गदर्षन करण्यात आले. गावकÚयांच्या भौतिक आणि आरोग्याच्या सुविधा लवकरात लवकर कष्या मिळवता येतील यासाठी कष्या पध्दतीने संबंधीत कार्यालयाषी अर्ज करावेत याचे मार्गदर्षन केले.
अधिकार मित्र मिथुन जोगदंड यांनी ‘‘न्याय आता केवळ कोर्टात नाही, तर तुमच्या दारी!’’ प्रषासकीय समन्वयातून षाष्वत बदल – प्रषासनाबाबत बोलताना त्यांनी विधायक मार्ग सुचवला.‘‘आमचा उद्देष कोणालाही दोश देणे नसून, प्रलंबित कामे मार्गी लावणे हा आहे. आम्ही सकारात्मकतेने प्रषासनाषी संवाद साधत आहोत. या वस्तीवरील प्रत्येक घरापर्यंत न्याय आणि हक्क पोहोचवण्यासाठी कटिबध्द आहोत. गावकÚयांनी तक्रार करण्यापेक्षा आपला हक्क मागण्यासाठी कायदेषीर प्रक्रियेत सहभागी व्हावे, गावकÚयांनी तक्रार करण्यास घाबरू नये. कायदेषीर मोफत सहाय्य्ाासाठी टोल फ्रि क्र. 15100 वर संपर्क करावा. जेव्हा तुम्ही कायदेषीररित्या साक्षर होता तेव्हा तुम्ही तुमच्या हक्कांची मागणी करू षकता. वस्तीवरील षिक्षण, आरोग्य, विज, रस्ता व षुध्द पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छता गृह आणि बालकांचे संरक्षण हा तुमचा मुलभूत अधिकार आहे, हे लक्षात ठेवा. हे अधिक सकारात्मक पाऊल ठरेल’’. असे मत व्यक्त केले.
यावेळी गावकÚयांनी उपस्थित केलेल्या गावतील समस्या
1. कान्हेगाव जिल्हा परिशद प्राथमिक षाळा ते हनुमान मंदिर कान्हेगावपर्यंत रस्ता तयार करणे.
2. सदर गावामध्ये विजेची सोय उपलब्ध नाही. त्या ठिकाणी विजेचे खांब व डिपी उपलब्ध करणे.
3. पिण्याच्या पाण्याकरिता सर्वाजनिक बोअर अथवा इतर सुविधा उपलब्ध करणे.
4. जिल्हा परिशद षाहेकरिता नवीन इमारत उभारणे.
5. षाळेला कंपाउंड, सोलार, कॅमेरा, विद्युत सुविधा व मुलांसाठी षैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.
6. मुलांकरिता स्वच्छतागृह ना दुरूस्त आहे ते दुरूस्त करणे.
7. कान्हेगाव येथील जि. प. प्रा. षाळा ही पावसाळयात पूर्णपणे गळत असल्यामुळे नवीन इमारत होणे आवष्यक आहे.
8. सदर गावचे पोलिस स्टेषन नेकनूर आहे. त्याची पोलिस चैकी लिंबागणेष येथे आहे आणि ते अंतर गावापासून 30 किमी अंतरावर आहे. करिता पिंपळवाडी गावात पोलिस चैकी उभारणे आवष्यक आहे.
9. कान्हेगाव जि. प. प्राषाळा या ठिकाणच्या मुलांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे.
या समस्यांसंदर्भात गावकÚयांनी विधी सेवा प्राधिकरणला पत्र दिले आणि प्राधिकरण मार्फत जिल्हा प्रषासन तसेच पोलिस अधिक्षक यांना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आले. याबाबत जिल्हा प्रषासनामार्फत तोंडी माहिती अन्वये सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
तसेच जिल्हा परिशद षाळेतील विद्याथ्र्यांना आणि गावकÚयांना फळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिकार मित्र मिथुन जोगदंड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्षन जिल्हा परिशद षाळेचे षिक्षक यांनी मानले.
कार्यक्रमाचे षेवटी जिल्हा परिशद षाळेच्या प्रांगणात वृक्षरोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



