बीड
शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्या प्रकरणी आरोपीस शिक्षा

शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्या प्रकरणी आरोपीस शिक्षा
मा. एस. एस. घोरपडे साहेब, जिल्हा व सत्र न्यायाधीश, ४ थे बीड यांचा महत्वपुर्ण निकाल
ता.जि.बीड :- दिनांक ०८.०६.२०१६ रोजी फिर्यादीस उप जिल्हा रुग्णालय, गेवराई येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णास उपचार करीत असताना मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश ४ थे बीड मा. एस. एस. घोरपडे साहेब, यांनी आरोपी राहुल अदिनाथ बांगर यास कलम ३५३,३३२,५०६ भा.द.वि तसेच कलम ४ महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांस प्रतिबंध) अधिनियम, २०१० अन्वये दोषी ठरवुन तीन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ८०००/- रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकारी वकिल अॅड बी.एस. राख यांनी काम पाहिले.
प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, दि. ०८.०६.२०१६ रोजी संध्याकाळी ८.०० ते ०९.०६.२०१६ रोजी सकाळी ८ वाजे पर्यंत उप जिल्हा रुग्णालय, गेवराई येथे फिर्यादीची अपघात विभागामध्ये कर्तव्य करीत असतांना रात्री ११:३० सुमारास एक विषबाधा झालेली महिला अत्यावस्थ अवस्थेत रुग्णालयात शरीक झाली तिच्यावर उपचार करीत असतानां अजुन एक रुग्ण दवाखान्यात शरीक झाला त्यावेळी त्याचे नातेवाईकांनी आमच्या रुग्णावर आधी उपचार करा असे डॉक्टरंना म्हणत होते त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना असे सांगितले की, दुसरा रुग्ण हा अत्यावस्थ असुन त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. दोन्ही रुग्णांवर उपचार करतो मला वेळ दया असे म्हणाले त्याचवेळी आरोपी राहुल अदिनाथ बांगर हा डॉक्टरांच्या पाठीमागे अपघात विभागात गेला व त्याने डॉक्टरांना लाथाबुक्यांनी मारहाण केली व त्याचे कर्बरेला असलेला चाकु चा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ केली व इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी शासकीय काम करत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल अदिनाथ बांगर व इतरां विरुध्द क. ३५३,३३२,५०४,५०६,३४ भा.द.वि प्रमाणे व कलम ४/२५ भारतीय शस्त्र कायदा तसेच कलम ४ महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक
कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांस प्रतिबंध अधिनियम अधिनियम २०१० अन्वये पो. स्टे गेवराई येथे गु र.नं. २५८/२०१६ मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास ए. टी. मालुसरे, पो.उप. नि यांनी केला. त्यांनी सदर प्रकरणात तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
सदर प्रकरणाची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश-४थे बीड यांचे न्यायालयात झाली. सदर आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकुण ७साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात साक्षीदारांची साक्ष व घटनास्थळ पचं, फिर्यादी, डॉक्टर व तपासी अधिकारी यांचे पुराव्याचे अवलोकन करून जिल्हा सरकारी वकिल अॅड. बी.एस. राख यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, – ४थे श्री एस. एस. घोरपडे_साहेब, यांनी आरोपी राहुल अदिनाथ बांगर रा गेवराई यांना क. ३५३ भा.द.वि प्रमाणे दोषी ठरवुन तीन वर्ष सश्रम कारावास व रु. ५०००/- दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसचे कलम ३३२ भादवी प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व रु. १०००/- दंड व दंड न भरल्यास १ महिन्याचा कारावास तसेच कलम ५०६ प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व रु. १०००/- दंड व दंड न भरल्यास १ महिन्याचा कारावास तसेच कलम ४ महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांस प्रतिबंध अधिनियम २०१० प्रमाणे १ वर्षे सश्रम करावास व १००० रु दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सदर प्रकरणा मध्ये सरकारी पक्षातर्फे अडॅ. बी. एस. राख यांनी काम पाहिले. तसेच या प्रकरणी पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल श्री. ऋषीकेश सानप, एलपीसी एस. ए. चव्हाण मॅडम ब.नं. ५६५ यांनी सहकार्य केले.
(अॅड. बी. एस. राख )
जिल्हा सरकारी वकिल, बीड.



