बीड

बीड शहर वाहतूक पोलिसांच्या उत्कृष्ट नियमनामुळे रस्ते घेतयत मोकळा श्वास;महामानव ग्रुपच्या वतीने सत्कार

बीड शहर वाहतूक पोलिसांच्या उत्कृष्ट नियमनामुळे रस्ते घेतयत मोकळा श्वास;महामानव ग्रुपच्या वतीने सत्कार
बीड, दि. 3 जुलै 2026 (प्रतिनिधी): बीड शहर वाहतूक शाखेने केलेल्या धडाकेबाज अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील सर्वच रस्ते मोकळे झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अतिक्रमणधारकांच्या विळख्यामुळे बीडच्या जीवनवाहिनीवर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली होती.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, पोलीस उपनिरीक्षक संजय कुकलारे, पोलीस हवालदार सखाराम घोलप, पोलीस वाहन चालक संतोष हरके, शुभम सानप व राहुल घाडगे यांनी सण-उत्सव, मोर्चे, व्हीआयपी बंदोबस्त व पावसाळी आपत्कालीन परिस्थितीतही उत्कृष्ट वाहतूक नियमन करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास उपलब्ध करून दिला.
या कर्तव्यनिष्ठेचा व प्रसंगावधानाचा गौरव करण्यासाठी महामानव ग्रुपचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वासनिक, सेवानिवृत्त पीएसआय तानाजी शिंनगारे, डॉ. गणेश खेमाडे, डॉ. शरद वीर, भास्कर पिंपरीकर, सिद्धार्थ वाघमारे, सागर औसरमल, अरुण वाघमारे व कैलास वीर यांनी वाहतूक निरीक्षक वैभव पाटील यांच्यासह संपूर्ण वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘भारताचे संविधान’ हा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार केला. यावेळी वाहतुकीसंदर्भात अनमोल सूचनाही करण्यात आल्या.
सत्काराला उत्तर देताना वाहतूक पोलीस निरीक्षक वैभव पाटील म्हणाले, “रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे लोखंडी कठडे व इतर साहित्य व्यावसायिकांनी स्वतःहून बाजूला करून रस्ता रिकामा केला. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मी बीडकर नागरिकांचे आभार मानतो.” तसेच लवकरच बीड शहरातील प्रमुख चौकांमध्ये अद्ययावत पोलीस चौकी उभारण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
Back to top button