बीड
काळाबरोबर कलावंतानी बदललं पाहीजे ः डॉ. दीपा क्षीरसागर

सौ.के.एस.के. महाविद्यालयात अभिनय तंत्र ः नाटक आणि सिनेमा कार्यशाळा संपन्न
बीड (प्रतिनिधी) ः काळाबरोबर कलावंतानी बदललं पाहीजे, नवनविन तंत्राचा वापर आत्मसात करुन त्यांचा वापर आपल्या अभिनय कौशल्यात, दिग्दर्शकीय पध्दतीत केला पाहीजे. नवनविन तंत्र आणि आताची गरज याची सांगड घालून कलावंतानी आपल्याला सिध्द करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगीतले.
सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड येथे अभिनय तंत्र – नाटक आणि सिनेमा या विषयावर एकदिवसीय कार्यशाळ संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक श्री. भूषण खोडके हे होते तर उद्घाटन नाटय परिषद अध्यक्ष तथा नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर व कार्यशाळा समन्वयक उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर मंचावर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी ही कार्यशाळा घेण्यात आली. अभिनय तंत्र ः नाटकातील आणि कॅमेरासमोरील अभिनय यावर कार्यशाळेत सखोल चर्चा व प्रात्यक्षीके घेण्यात आली. श्री.भूषण खोडके, प्रा. असलम शेख यांनी कॅमेरा त्यातील लेन्स, झुम व्हाईट, मीड, लाँन्गशॉट, क्लॉजशॉट, मीडशॉट, दिग्दर्शन, डबींग, एडीटींग, कथा, पटकथा यावर मार्गदर्शन केले. तर शॉट फिल्म कशी बनवावी व कोणत्या तंत्राचा वापर करावा याविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. याशिवाय काही ऑस्कर विनर चित्रपटातील दृश्य व काही महत्वाच्या शॉटफिल्म देखील दाखवण्यात आल्या.
या कार्यशाळेला विविध महाविद्यालयातील पंच्याऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पाटोदा, परळी, चौसाळा, गेवराई, बीड येथील महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, प्रशासक डॉ. व्ही. टी. देशमाने यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. ए.एस. खान, पर्यवेक्षक श्री. जालिंदर कोळेकर, डॉ. दुष्यंता रामटेके, प्रा. विजय राख, प्रा. असलम शेख, डॉ. वंदना फटाले, डॉ. राहुल सोनवणे, प्रा. दिपक जमधाडे, प्रा. सुरेश थोरात, प्रा. इंद्रजित भालेराव, डॉ. बालासाहेब पोटे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ. दुष्यंता रामटेके यांनी केले.