बीड
बीड जिल्हाच्या भुमिपुत्राने केली वसमतच्या गुंज येथील अपघातग्रस्त पीडित कुटुंबाला मदत

बीड जिल्हाच्या भुमिपुत्राने केली वसमतच्या गुंज येथील अपघातग्रस्त पीडित कुटुंबाला मदत
बीड:-नांदेड व हिंगोली जिल्हा सिमेवर शेतकरी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघाताची दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात घडली होती, या घटनेमध्ये वसमत तालुक्यातील गुंज येथील सात मजुर महिलांचा ट्रॅक्टर विहीरीत पडून मातंग समाजातील सहा व इतर एक अशा सात महिलांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली.
गुंजच्या लहुजीनगर वस्तीवर घडलेल्या घटनेने एकच आक्रोश झाला. गावाकडे थांबलेले या कुटुंबातील सदस्यांनी आपली आई, बहीण पुन्हा दिसणार नाही. या विचाराने हंबरडा फोडला. या वस्तीवर दिवसभर चुलही पेटली नाही. पोटाला दोन घास मिळावे या शोधात निघालेल्या महिलांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण गाव शोक सागरात बुडाले. ही वार्ता मुंबई येथील सकल मातंग समाजाचे नेते आणि मातंग ग्रुप डेव्हलपमेंट(एम.जी.डी.) परिवाराचे मार्गदर्शक माजी मुख्याधिकारी एस.एस.धुपे यांच्या कानावर पडताच आपण समाजाप्रती देणे लागतो या उदार विचाराने पिडीत अपघातग्रस्त सर्व कुटुंबातील दहा सदस्यांना जीवनावश्यक विविध संसार उपयोगी व जीवनावश्यक असणारे १० किट वाटप केले. मानवता धर्म म्हणून बीड जिल्हाच्या गेवराई येथील सुदामराव धुपे या भुमिपुत्राने वसमतच्या गुंज येथील कुटुंबाला मदत मदत लाख मोलाची ठरली.
यावेळी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रकाश कांबळे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, गेवराई नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ब्रह्मदेव धुरंधरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक खाजेकर सर, सामाजिक कार्यकर्ते एन.जी.पोतरे, डी. एन. शेळके, युवा नेते बाळू लोंढे, संजय गोटूमुखे, उप अभियंता प्रकाश ईश्वरे, अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे, प्रदेशाध्यक्ष उत्तम बाभळे, शिवाजी नुरुंदे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रोडे साहेब, महापालिकेचे उप अभियंता बाशेट्टी साहेब, साहित्यिक आणि कवी मनोहर बसवंते आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
***



