बीड
युवकांच्या श्रमातून गावच्या शाश्वत विकासास बळ. हेमंत सौदरमल.

युवकांच्या श्रमातून गावच्या शाश्वत विकासास बळ. हेमंत सौदरमल.
(बीड प्रतिनिधी). नवगण शिक्षण संस्थेचे कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय तेलगाव ता.धारूर जि. बीड.राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित शाश्वत विकास विशेष लक्ष,पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास:युवा या थीम खाली मौजे उपळी येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे दि.२१जाने २०२६ बुधवारी सकाळी १०:३० वाजता उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक ग्रामपंचायत सदस्य हेमंत सौदरमल बोलत होते.
ते म्हणाले की अशा श्रम संस्कार शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासा बरोबरच सामाजिक जाणीवा वाढीस लागण्यास मदत होते.तेव्हा युवकांनी श्रम प्रतिष्ठा जोपासत गावच्या विकासास बळ द्यावे.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या कार्यक्र च्या अध्यक्षस्थानी कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य भरत खेत्री, उपळी गावचे सरपंच सचिन हळकर, उपसरपंच विनायक शेळके, ग्रामविकास अधिकारी अमोल शिरसाट, जि प प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर, जि प उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख सादेक, रास आयोग कार्यक्रमाधिकारी डॉ.गणेश खेमाडे विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित हिवाळी विशेष श्रम संस्कार शिबिरा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधीकारी डॉ.गणेश खेमाडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.वामन भंडाणे यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉ.प्रा. बाळासाहेब जावळे,डॉ.प्रा.दत्ता शिंदे,डॉ.प्रा.कांता सोळुंके, डॉ.प्रा. प्रकाश सावते,प्रा.राजेश खटाने,सुरज कुऱ्हे, सतीश राऊत, ऋषिकेश कांबळे, यांसह रासेयो स्वयंसेवक, शिक्षक. शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



