बळेवाडी तलावातून आ.सुरेश धस यांच्या संकल्पनेतून “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेचा शुभारंभ

बळेवाडी तलावातून आ.सुरेश धस यांच्या संकल्पनेतून “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेचा शुभारंभ
****************************
सुपीक गाळाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे : गणेश शिंदे
************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथे मराठवाडा भूषण लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून व नियोजनातून बळेवाडी येथील महाराष्ट्र शासनाच्या साठवण तलावामध्ये “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” या महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ शुक्रवार दि. ९ मे रोजी या योजनेचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी प्रमुख गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार सुरेश धस यांनी या परिसरातील शेतकऱ्यांना या तलावातील गाळाचा लाभ मिळावा यासाठी“गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार” या योजनेसाठी पाठपुरावा करून या योजनेचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या योजनेमुळे तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.तसेच तलावातील सुपीक गाळ मुरूम,चुनखडकयुक्त,अतिपावसामुळे खराब झालेल्या तसेच नापीक जमिनीवर टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढून शेती उत्पादनात मोठी वाढ होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तलावातील गाळ पूर्णपणे काढल्यास सध्याच्या तुलनेत दुप्पट पाणी साठवण क्षमता वाढू शकते, असे गणेश शिंदे यांनी सांगितले.
बळेवाडी तलावातील गाळाचा लाभ बळेवाडी, पारगाव जोगेश्वरी, खडकत, सांगवी, वाळूज, टाकळसिंग आदी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास आष्टी तालुका दूध संघाचे संचालक चेअरमन गणेश मोकाशे,जलसंपदा विभागाचे सचिन आजबे, बळेवाडी साठवण तलावाचे व्यवस्थापक वसंत भोसले, निशांत जेवे, अशोक दिनकर भोसले,बद्रीनाथ भोसले, दिपक भोसले, सुरेश भोसले,वनविभाग कर्जतचे काकासाहेब भोसले,कल्याण झराड, सुदाम आजबे, लहू भोसले,नाना पोटफोडे, बारीकराव झराड,गणेश भोसले,देवीदास भोसले, गहिनाथ भोसले, रामदास भोसले, देवराव भोसले, पांडुरंग झराड, ज्ञानेश्वर झराड, संजय भोसले, बापूराव बळे, बापू काशीनाथ भोसले, राजेंद्र निगुडे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



