बीड
जुनेद बागवान यांचा वार्ड क्रमांक 11 च्या भाजपा उमेदवारांना पाठिंबा

जुनेद बागवान यांचा वार्ड क्रमांक 11 च्या भाजपा उमेदवारांना पाठिंबा
गेवराई : नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक अकरा मध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत, अपक्ष उमेदवार जुनेद जानमोहंमद बागवान यांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल जिजा खंडागळे व सायमा आकेफ काझी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
बागवान यांनी कोणत्याही अटी शर्थी न ठेवता आपला उमेदवारी अर्ज परत घेतला असून, भारतीय जनता पक्षाचे नेते बाळराजे पवार यांनी जुनेद बागवान यांचे स्वागत केले आहे. यावेळी माजी नगरसेवक एजाज भाई मेंबर, माजी नगरसेवक भरत गायकवाड, इस्माईल वली, राहूल जिजा खंडागळे यांची उपस्थिती होती.
गेवराई नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक अकराची पोटनिवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राहुल जिजा खंडागळे, सायमा आकेफ काझी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून युवा नेते जुनेद जानमोहंमद बागवान यांनी आपला अर्ज दाखल केला होता. मात्र, बागवान यांनी उमेदवारी अर्ज परत घेण्याचा निर्णय घेतला. माजी नगरसेवक एजाज भाई मेंबर यांच्या यशस्वी मध्यस्थीने बागवान यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. गेवराई नगर परिषदेच्या माध्यमातून आपण सोबत राहून काम करूत, असा आग्रह एजाज भाई यांनी केल्याने, त्यांच्या शब्दाला बागवान यांनी मान देऊन, निवडणूकीतून माघार घेतली. भारतीय जनता पक्षाच्या वार्ड क्रमांक अकराच्या अ आणि ब गटातील दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने, भाजपाचे पारडे जड झाले आहे.
जुनेद बागवान यांनी भाजपा च्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.
भारतीय जनता पक्षाचे नेते बाळराजे पवार यांनी जुनेद बागवान यांचे स्वागत केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक एजाज भाई मेंबर, गट नेते राजेंद्र राक्षसभूवनकर, माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, ॲड. जिजा घुंबार्डे, माजी नगरसेवक भरत गायकवाड, इस्माईल वली, राहूल जिजा खंडागळे, आकेफ काझी यांची उपस्थिती होती. दरम्यान, गेवराई नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक अकरा मध्ये होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी 20 जून रोजी मतदान होणार असून, दुसर्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.



