बीड
बेकायदेशीररित्या लोटस ३६५ चा खेळ..! महादेव ॲप या नावाचा ऑनलाईन जुगार खेळणारे व खेळविणारे ८आरोपी जेरबंद..!

बेकायदेशीररित्या लोटस ३६५ चा खेळ..!
महादेव ॲप या नावाचा ऑनलाईन जुगार खेळणारे व खेळविणारे ८आरोपी जेरबंद..!
८ लाख १५ हजार५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला केले गजाआड
केज/प्रतिनिधी
येथील पोलीस ठाण्याच्या
हाद्दीमध्ये विनापरवाना व बेकायदेशीर रित्या लोटस ३६५ नावाचे ऑनलाईन जुगार खेळणारे व खेळविणाऱ्या ८ गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करून ८ लाख १४ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल विषेश पथकाने जप्त केला आहे.
गुरुवारी दिनांक २५ जून रोजी रात्री ९-३० वाजण्याच्या दरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांना एका गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीती वरून पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलीस हवालदार धोंडीराम योगीराज मोरे, राजु वंजारे, विशाल क्षिरसागर, अनिल मंदे, मिसबा इनामदार, मल्लीकार्जुन माने, पोलीस अंमलदार जरगर, मयुर टकले,
यांच्या विशेष पथकाने अनंत नवनाथ खंदारे वय २३ वर्षे रा. कारेगव्हाण ता. जि.बीड, अक्षय अनिल गायकवाड वय २० वर्षे रा.सिंहगड रोड, हिंगणी खुर्द, माधव नगर, गणेश कॉलनी, घर क्र.३०जि. पुणे, अनिल कबीर सानप वय २३ वर्षे रा. सानपवाडी ता. जि.बीड, आसाराम बळीराम केकाण वय २५ वर्षे रा. दरडवाडी ता. केज, गणेश लक्ष्मण खंदारे वय २२ वर्षे रा. कारेगाव्हाण ता. जि.बीड, हर्षल मनोहर खंडारे वय २७ वर्षे रा. कौंडण्यपुर ता. तिवसा जि. अमरावती, सुशील दत्तात्रय मुंडे वय २४ वर्षे रा. कोठारबन ता. वडवणी,विशाल उत्तम बारवाळ वय २० वर्षे रा. पिंप्री एलोरा ता. खुलताबाद जि.छ. संभाजीनगर यांनी मिळून त्यांच्या सर्वाच्या आर्थिक फायद्याकरीता लोकांना जास्त पैसे मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन विनापरवाना बेकायेदशिररित्या लोटस ३६५ ॲपमध्ये विविध खेळावर ऑनलाईन जुगारखेळत व खेळवित असतांना वेगवेगळ्या कंपनिची ३४ मोबाईल, ४ मोटार सायकल, ३ वेगवेगळ्या कंपनिचे मोबाईल असे एकुण ८ लाख १४ हजार ५०० रुपयाचा माल मिळुन आल्याने त्याच्याविरुध्द जमादार धोंडीराम मोरे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याअनर्गत केज पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आसून सदरील घटनेचा पुढील तपास हा केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू वंजारे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक वेंकटराम यांचे मार्गदर्शना खाली विशेष पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकातील
पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलीस हवालदार धोंडीराम योगीराज मोरे, राजु वंजारे, विशाल क्षिरसागर, अनिल मंदे, मिसबा इनामदार, मल्लीकार्जुन माने, पोलीस अंमलदार जरगर, मयुर टकले, यांनी केली



