पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक रिंगणात उतरणार – प्रा. मधुकर राळेभात

पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक रिंगणात उतरणार – प्रा. मधुकर राळेभात
जामखेडचा चेहरामोहरा बदलणार; कोट्यवधी निधी आणण्याचा निर्धार
जामखेड प्रतिनिधी :
“जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी कणखर व खमक्या नेतृत्वाची गरज आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास मी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार. जामखेड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा माझा संकल्प असून, कोट्यवधी रुपयांचा निधी शहरासाठी आणू, असा ठाम विश्वास प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केला.
आगामी काळात होणाऱ्या जामखेड नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणूक तसेच शहरातील विविध विकास योजनांवरून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
*एमआयडीसी नसल्याने युवक बेरोजगार – उद्योगांसाठी कॉम्प्लेक्स*
पुढे बोलताना प्रा.राळेभात म्हणाले,
सक्षम उमेदवार म्हणून विश्वासाने उमेदवारी मागतो.सुज्ञ, जागरूक व सेवाभावी उमेदवाराची शहराला गरज आहे. माझी पत्नी सौ. सुनिता मधुकर (आबा) राळेभात यांना उमेदवारी दिली तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.जामखेडमध्ये एमआयडीसी नसल्यामुळे युवक बेरोजगारी वाढली आहे. छोटे उद्योग सुरू करु इच्छिणाऱ्यांना भांडवल व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष उद्योग कॉम्प्लेक्स उभारणार. उद्योजकांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी बचत गट काॅम्प्लेक्सला प्रोत्साहन,महिला-बालकल्याण समितीमार्फत योजनांची अंमलबजावणी करणार.
*शेतकरी १० वर्षांपासून वंचित – कृषी विभागाशी समन्वय*
नगर परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजना उपलब्ध करून देणार. दहा वर्षांपासून शेतकरी योजनांपासून वंचित असून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न होणार.
शांतता, सामाजिक सलोखा आणि शिक्षणाला प्रथम प्राधान्य
…हिंदू-मुस्लिम समाजात ऐक्य राहावे, शांतता नांदावी हा आमचा विचार…शांतिनाथ महाराज व इमामशहा वली बाबांच्या संजीवन समाधीमुळे जामखेड हे धार्मिक एकतेचे प्रतीक.उच्च दर्जाचे शिक्षण संकुल उभारून विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध करणार.शैक्षणिक विकास झाला की शहराचा सामाजिक आणि व्यावसायिक स्तर उंचावतो.
२५ वर्षांत बदललेले जामखेड, आता हवे आधुनिक जामखेड”शहरातील रस्ते, पाणी, उद्याने, स्वच्छता यासाठी मोठ्या निधीची मागणी. सत्तेत आमचा पक्ष असल्याने केंद्र व राज्यातून विकासकामांसाठी निधी आणणे सोपे…
यावेळी नगरसेवक दिगंबर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव ढेपे, भाजपा व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष निलेश (पिंटूशेठ) बोरा, गणेश राळेभात, उद्धवराव हुलगुंडे, ॲड. अमृत राळेभात, राजू वारे, विलास मोरे, वैभव काटकर, सुरज व लखन राळेभात आदी मान्यवर उपस्थित होते.



