श्री क्षेत्र गौतमऋषी देवस्थानास धाकट्या ब्रह्मगिरीचे महात्म्य!

काकडा सांगता निमित्त महापंगत संपन्न
बीड प्रतिनिधी:-बीड शहरापासून पालवन श्री क्षेत्र गौतमऋषी संस्थान घोलपदरा पालवन येथे
ह.भ.प.श्री.गु.महंत श्रीरंग महाराज डोंगरे यांच्या मार्गदर्शना आयोजित काकडा सांगता निमित्ताने ह.भ.प.श्री. रामायणाचार्य विश्वंभर महाराज माळोदे यांच्या सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले असुन या निमित्ताने राजेंद्र मस्के परिवारातर्फे महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री. क्षेत्र गौतमऋषी देवस्थान जिल्ह्यात भाविक भक्तांच्या श्रद्धेमुळे विख्यात झाले असून दर अमावस्येला भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. या देवस्थानवर येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी रस्ता, नाल्या, लाईट, पाणी अशा मुलभूत
पालवण ग्रामस्थ व राष्ट्रवादी शरदपवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकाराने
सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संक्रांति दरम्यान त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी अलोट गर्दी असते. त्याच धर्तीवर बीड व पंचक्रोशीतल भाविकांची प्रदक्षिणेसाठी गर्दी होते. गेली अनेक वर्षापासून प्रदक्षिणेची परंपरा भक्तांनी संवर्धित केली आहे.
महर्षी गौतम ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्राचीन तपोभूमीत संत महंत ऋषी मुनींच्या कृपा आशीर्वादाने भाविक भक्तांच्या विशेष परिश्रमातून श्री त्र्यंबकेश्वर महादेव व श्री रुक्मिणी पांडुरंगाचे भव्य नतून मंदिराचे व शिखराचे बांधकाम करण्यात आले आहे.तसेच या संस्थानात
श्री रुक्मिणी पांडुरंग, जगद्गुरु तुकाराम महाराज महंत गुरु महादेव बाबा यांच्या नतुन मूर्तीची स्थापना यापूर्वीच करण्यात आलेल्या आहेत. यामुळे परिसरातील भाविक बहुसंख्येने या गौतम ऋषी देवस्थान मध्ये दर्शनासाठी व आध्यात्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
चातुर्मासाच्या निमित्ताने आज काकडा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



