बीड
जामखेड येथे मोफत तीन दिवसीय योग शिबीर; आरोग्यासाठी सुवर्णसंधी!

जामखेड येथे मोफत तीन दिवसीय योग शिबीर; आरोग्यासाठी सुवर्णसंधी!
जामखेड प्रतिनिधी: जामखेड शहरात दिनांक ८ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान नगर रोडवरील महावीर भवन समोरील सुमेरु हॉल येथे भांड्याचे प्रसिद्ध व्यापारी तथा योग शिक्षक जितेंद्र बोरा यांच्या निवासस्थानी सकाळी ६:३० ते ८:०० या वेळेत मोफत तीन दिवसीय योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शिबीरात योगा, प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रियेच्या सत्रांचा समावेश आहे. यामुळे मानसिक शांतता, शरीराची तंदुरुस्ती, नींद गाढ येणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याचे फायदे होणार आहेत.तरी इच्छुकांनी ९२२६११७९४२ किंवा ७५०७३५९८७१ या नंबरवर नोंदणी करावी.
शिबीरात सहभागी होणाऱ्यांनी पाणी बाटली आणि योगा मॅट स्वतः सोबत आणणे आवश्यक आहे. नागरिकांनी शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जितेंद्र बोरा यांनी केले.



