बीड
जिल्हाधिकारी कार्यालयात बाळराजे दादा पवार यांची सदिच्छा भेट; गेवराईतील प्रश्नांवर चर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयात बाळराजे दादा पवार यांची सदिच्छा भेट; गेवराईतील प्रश्नांवर चर्चा
गेवराई (प्रतिनिधी) : दि. 4 एप्रिल रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आदरणीय लोकनेते बाळराजे दादा पवार यांनी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. व गेवराई तालुक्यातील विविध प्रश्नावर चर्चा केली.
सदरील भेटीदरम्यान गेवराई मतदारसंघातील नागरिक तसेच कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रलंबित सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विविध प्रशासकीय पातळ्यांवर अडकून पडलेली कामे तात्काळ मार्गी लागावीत, यासाठी बाळराजे पवार यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. तसेच सर्वसामान्यांच्या अडीअडचणींकडे प्राधान्याने लक्ष देऊन त्या जलद गतीने सोडवाव्यात, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत बाळराजे दादा पवार हे नेहमीच तत्पर असतात. गेवराई मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते सातत्याने सांगत असतात. या भेटीमुळे गेवराईतील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



