बीड
सौ.के.एस.के. महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त ऑनलाईन प्रश्नमंजूषा संपन्न

बीड(प्रतिनिधी)ः येथील नवगण शिक्षण संस्थेचे सौै.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त, विज्ञान मंडळ व भौतिकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन भौतिकशास्त्र प्रश्नमंजुषाचे आयोजन दुपारी 4 ते 5 या वेळेत करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयातील एकूण 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रूपये 1500 व ई प्रमाणपत्र कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविंंद्यालयातील विद्यार्थी भोकरे हर्षल आप्पा यास तर द्वितीय पारितोषिक रूपये 1000 व ई प्रमाणपत्र विभागून संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगावची विद्यार्थिनी कु.श्रुती ओंमकारेश्वर पाटील आणि बलभीम महाविद्यालय बीडची विद्यार्थिंनी ऋतिका हटकर यांना तसेच तृतीय पारितोषिक रू 500 व ई प्रमाणपत्र विभागून सौ.के.एस.के.महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.घोलप पुजा मोहन व बलभीम महाविद्यालय बीडची विद्यार्थीनी मधुरा मनोज नेवडे यांना मिळाले.
सर्व सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांचे सौ.के.एस.के.महाविद्यालयाचे प्राचार्य,भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व स्पर्धेचे मुख्यकार्यक्रमाधिकारी डॉ.शिवानंद क्षीरसागर, निमंत्रक डॉ.प्रज्ञा महेशमाळकर, विज्ञान मंडळाचे प्रमुख व या स्पर्धेचे समन्वयक डॉ.अशोक डोंगरे यांनी केले. तर सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचानी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
तसेच महाविद्यालयाचे संस्थेचे प्रशासकिय अधिकारी डॉ.सुधाकर गुट्टे, डॉ.विश्वांभर देशमाने, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.खान ए.एस., उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर यांनी सर्व सहभागी व विजेते विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.