📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करुन मंदिर बांधू – आ.विजयसिंह पंडित

समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करुन मंदिर बांधू – आ.विजयसिंह पंडित
गेवराईतील गवळी समाज बांधवाचे पंडित यांना निवेदन देऊन मागणी
गेवराई दि.१२ (प्रतिनिधी):- गेवराई शहरातील विरशैव लिंगायत गवळी समाजाला आजवर हक्काचे समाज मंदिर व जागा मिळाली नव्हती,मात्र आ.विजयसिंह पंडित यांच्यामुळे गवळी समाज बांधवांना आता हक्काचे समाज मंदिर व जागा मिळणार आहे.शुक्रवार रोजी गवळी समाज बांधवांनी आ.विजयसिंह पंडित यांची भेट घेत निवेदन दिले.यावेळी समाज बांधवांना उत्तर देताना आ.विजयसिंह पंडित म्हणाले की,गवळी समाज बांधवांना लवकरच गेवराई शहरात समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करुन समाजाचे मंदिर उभारण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.दरम्यान मागिल अनेक वर्षांपासून हि मागणी गवळी समाज बांधव विविध राज्यकर्त्यांना करत आले आहेत.मात्र आ.विजयसिंह पंडित यांनी गवळी समाजाच्या मंदिरासाठी जागा व मंदिर उभारण्यासाठी आता पुढाकार घेतल्याने शहरातील गवळी समाज बांधवांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
 विरशैव लिंगायत गवळी समाज बांधवांचे गेवराई विधानसभा मतदारसंघात केवळ गेवराई शहरातच दुध व्यवसायामुळे वास्तव्य आहे.शहरात गधळी समाज बांधवांच्या मंदिरासाठी जागा देण्यात येऊन मंदिर उभारण्यात यावे यासाठी मागिल अनेक वर्षांपासून विविध राज्यकर्त्यांना समाज बांधवांनी मागणी केली.मात्र या मागणीकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष करत समाज बांधवांचा निवडणुकीपुरता वापर केला गेला.आ.विजयसिंह पंडित हे आमदार होताच शहरातील गवळी समाजाच्या त्यांच्याकडून अशा पल्लवीत झाल्या आहेत.तसेच माजी आमदार अमरसिंह पंडित यांना देखील पंधरा दिवसांपुर्वी समाज बांधवांनी मागणी करताच त्यांनी या मागणीसाठी सकारात्मक भुमिका घेतली आहे.शुक्रवार रोजी शहरातील गवळी समाज बांधवांनी आ.विजयसिंह पंडित यांची कृष्णाई येथे भेट घेतली.गेवराई शहरात गवळी समाज बांधवांसाठी समाजाच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी,तसेच मंदिर बांधण्यासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी आ.विजयसिंह पंडित यांनी गवळी समाज बांधवांच्या मागणीला उत्तर देताना सांगितले की,गेवराई शहरात गवळी समाजाच्या मंदिरासाठी लवकरच जागा उपलब्ध करुन देऊ, तसेच मंदिर बांधण्यासाठी निधी देण्यात येईल असे आश्वासन आ.पंडित यांनी यावेळी दिले.
यावेळी नारायण अवधुत, भागवत परळकर,सुंदरआप्पा दंहिडे,दत्ता हादगुले,बाबा अवधुत, रामेश्वर अवधुत,शंकर हादगुले, बबन परळकर, सोमनाथ नामदेव,शंकर हादगुले,मनोज हादगुले आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.दरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित व आ.विजयसिंह पंडित यांनी आता याबाबत लक्ष घातल्याने या मागणीला लवकरच यश येणार असल्याने समाज बांधवांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
Back to top button