📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

इतिहास उजळणार!पर्यटन विकासाचा नवा अध्याय!

इतिहास उजळणार!पर्यटन विकासाचा नवा अध्याय!

खर्डा किल्ला संवर्धनाला गती! – सभापती राम शिंदे यांचे तातडीचे निर्देश

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा शिवपट्टण किल्लाला राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरुस्ती करण्याकरिता सुशोभीकरण,संरक्षण भिंत, बाग बगीचा, विद्युत रोषणाई, नवीन दरवाजा या बाबींचा नव्याने समावेश करून फेरनिविदा काढण्यात यावी तसेच सर्व कामे जलद गतीने करण्यासंदर्भातील कामकाजाचा अहवाल पुढील एक महिन्यात सादर करण्याची निर्देश विधान परिषदेचे सभापती आमदार प्रा. आ.राम शिंदे दिले.
या बैठकीचे आयोजन विधिमंडळ येथे सांस्कृतिक कार्यमंत्री अँड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत किल्ल्याच्या कामाचा संदर्भात आढावा घेण्यात आला होता. या बैठकीतील निर्णयामुळे खर्डा किल्ल्याचे भाग्य उजळणार असून होणाऱ्या विकास कामामुळे व येथे येणाऱ्या इतिहास प्रेमी पर्यटकांना व जामखेड तालुक्यातील नागरिकांना मोठी पर्वणीच ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा तसेच गाव स्तरावर असलेल्या महावारसा समिती तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना स्मारकाची दागडुजी जतन करताना विचारात घ्याव्यात असे निर्देश यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी दिले.
सभापती राम शिंदे साहेब म्हणाले की, स्मारकाच्या ठिकाणी किल्ल्याच्या खंदकातील संरक्षित भिंत,बुरुज खोल्या, यांची दुरुस्ती व संवर्धन करणे तसेच प्रवेश दरवाजा बांधणे संरक्षित भिंत उभारणे, विद्युत रोषणाई करणे या बाबींचा समावेश करून फेरनिविदा काढण्यात याव्यात व खर्डा किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीचा कामास एक महिन्याच्या आत अधिकाऱ्यांनी गती द्यावी असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय संचालनायाचे संचालक तेजस गर्गे, सहाय्यक संचालक अमोल गोरे, या विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, अहिल्यानगर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र सुरवसे उपस्थित होते.

Back to top button