संपादकीय

अभिनेत्री प्रीती झिंटा झाली आई, वयाच्या ४६ व्या वर्षी झाली जुळी मुलं !

 

अभिनेत्री प्रीती झिंटा वयाच्या ४६ व्या वर्षी जुळ्या मुलांची आई झालीये. प्रीती आई झालीये तर पती जेन गुडइनफ बाबा झालाये. मी आज सर्वांना अत्यानंदाची बातमी देऊ इच्छिते. जेन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आमची मनं कृतज्ञतेनं भरून आलंय. कारण आम्ही आमच्या जुळ्या मुलांचं कुटुंबात स्वागत करतोय,’ असे प्रीतीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

या पोस्टमध्ये प्रीतीने तिच्या मुलांची नावंसुद्धा सांगितली आहेत. जय आणि जिया अशी दोघांची नावं आहेत. सरोगसीच्या माध्यमातून जुळ्यांचा जन्म झाला आहे. यापैकी एक मुलगा आहे व एक मुलगी. आमच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल आम्ही दोघं खूप उत्सुक आणि आनंदी आहोत. या अविश्वसनीय प्रवासात आमची साथ देणा-या डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे मन:पूर्वक आभार असं तिने पुढे लिहिलं आहे.

पाच वर्षांपूर्वी प्रीतीने तिच्यापेक्षा १० वर्षे लहान अमेरिकन बॉयफ्रेन्ड जेन गुडइनफसोबत लग्नाच्या बंधनात अडकली होती. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजिलिसमध्ये दोघांनीही हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नाची बातमी प्रीतीने अनेक महिने लपवून ठेवली होती. सुमारे 6 महिन्यानंतर या लग्नाचे फोटो समोर आले होते. प्रीती व जेन दोघेही सध्या अमेरिकेत राहतात. जेन पेशाने फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट आहे.

Back to top button