बीड

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेंच्या माध्यमातून ; दीड कोटींच्या शेतकरी भवनास मान्यता

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेंच्या माध्यमातून ; दीड कोटींच्या शेतकरी भवनास मान्यता

सभापती पै. शरद कार्ले व संचालक मंडळाच्या पाठपुराव्याला यश

जामखेड :जामखेड तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल रु. १,४६,७५,६८४ (एक कोटी सहेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी) खर्चून “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारले जाणार आहे.

या निर्णयाला बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले व संचालक मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित म्हणून पाहिले जात आहे. राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २२ एप्रिल रोजी या योजनेस प्रशासकीय मान्यता दिली आहे.राज्याच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाने आज दि. २२ एप्रिल रोजीच सदर मान्यतेचे परिपत्रक जारी केले.

नवीन शेतकरी भवनामुळे बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मुक्कामाची तसेच मूलभूत सुविधांची सोय उपलब्ध होणार आहे. प्रा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या विविध विकासकामांमध्ये हे आणखी एक मोलाचे पाऊल ठरणार आहे.

या निर्णयाचे जामखेड तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, संचालक मंडळ आणि नागरिकांनी आनंदाने स्वागत करत राज्य शासन व प्रा. राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Back to top button