म.गा.ग्रा.रो.यो. अंतर्गत नवीन कामांना मान्यता बंद आमिषाला बळी न पडण्याचे गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने यांचे आवाहन

म.गा.ग्रा.रो.यो. अंतर्गत नवीन कामांना मान्यता बंद
आमिषाला बळी न पडण्याचे गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने यांचे आवाहन
आष्टी (प्रतिनिधी):आष्टी तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (म.गा.ग्रा.रो.यो.) अंतर्गत सध्या कोणत्याही नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देणे बंद करण्यात आले आहे. यामध्ये जलसिंचन विहीर, शेततळे, शेळीपालन शेड, वृक्ष लागवड, फळबाग लागवड आदी सर्व कामांचा समावेश आहे.
केंद्र शासनाकडून सदर कामांचे सांकेतांक (वर्क कोड) काढण्याची प्रक्रिया सध्या थांबविण्यात आल्यामुळे नवीन कामांना मंजुरी देता येणार नसल्याची माहिती पंचायत समिती आष्टीचे गट विकास अधिकारी गोकुळ बागलाने यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील लाभार्थी व नागरिकांनी कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नये तसेच दलालांच्या आमिषाला आहारी जाऊ नये, असे स्पष्ट आवाहन गट विकास अधिकारी बागलाने यांनी केले आहे. याबाबत कोणीही पंचायत समिती आष्टी येथे कोणतेही प्रस्ताव दाखल करू नयेत, असेही त्यांनी आवाहन लाभार्थी व नागरिक यांना केले आहे.



