जि.प. प्रा.केंद्र शाळा पाटोदा येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी

जि.प. प्रा.केंद्र शाळा पाटोदा येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी
तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील जि.प.प्राथ.केंद्र शाळा पाटोदा येथे भिमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या निमित्ताने विद्यार्थ्यांचे भाषणे झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला पेन बक्षीस देण्यात आले . शाळेतील उपक्रमशील शिक्षक जितेंद्र आढाव यांनी संविधान जागृती व डॉ . आंबेडकर यांच्या डिग्री ची माहिती देणारे बसवलेल्या पथनाट्याचे शाळेत व बसस्टॅन्ड पाटोदा येथे सादरीकरण करण्यात आले ,ग्रामस्थांनी मुलांचे खुप खुप कौतूक केले व बक्षीसे दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शा.व्य . समितीचे अध्यक्ष अमोल निंबाळकर होते तर प्रमुख पाहुणे प्रशांत सातपुते ( ग्रामसेवक ) ,प्रदीप वराडे , महालिंग हिंगमिरे , राहूल शिंदे इतर मान्यवर होते.शाळेचे आदर्श शिक्षक ,पर्यावरण प्रेमी,कार्य कुशल मुख्याध्यापक उत्तम पवार यांनी मार्गदर्शन करुन महापुरुषांचे विचार डोक्यात घेऊन आचारणात आणण्याची गरज आहे असे सांगितले .
सुत्रसंलन अनिल अष्टेकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीम . गीता रासने व सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली सर्वांचे आभार संतोष डोके यांनी मानले .



