📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत श्री नागेश विद्यालयाचा दबदबा! सात खेळाडू फायनलमध्ये, तीन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत श्री नागेश विद्यालयाचा दबदबा!

सात खेळाडू फायनलमध्ये, तीन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जामखेड प्रतिनिधी – जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे जिल्हास्तर शालेय वुशू क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत श्री नागेश विद्यालयाच्या खेळाडूंनी आपला ठसा उमटवत वर्चस्व गाजवले.

तब्बल आठ खेळाडूंनी फायनलमध्ये प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यापैकी अमित गायकवाड, श्रेयश वराट आणि वेदांत निंबाळकर या तिघांनी सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. धनंजय शिरगिरे, आदित्य अडाले, अरमान पठान आणि ओम सराफ यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर श्रवण सराफ, श्रीनिवास म्हेत्रे, स्वरूप वसावे आणि ओम धुमाळ यांनी तृतीय क्रमांक मिळवून विद्यालयाचा मान उंचावला. याशिवाय उत्कर्ष अरसूळ, विनायक जाधव आणि ज्ञानेश्वर आजबे तसेच १९ वर्ष वयोगटातील शिवम राळेभात आणि रेहान मुलानी यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला.

हे सर्व खेळाडू वुशू प्रशिक्षक व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक *श्री.आबासाहेब जायगुडे* यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. खेळाडूंच्या शिस्तबद्ध सराव, प्रखर जिद्द आणि उत्कृष्ट प्रशिक्षणामुळे हा बहुमान मिळाल्याचे सर्वत्र गौरवले जात आहे.

या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी *श्री. ज्ञानेश्वर खुरांगे* विद्यालयाचे प्राचार्य *श्री बी. के. मडके सर*, उपप्राचार्य *श्री.नाळे सर* आणि पर्यवेक्षक *श्री.जाधवर सर* क्रीडा अधिकारी *प्रियंका खिंडरे मॅडम* यांनीही खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
तसेच सहाय्यक शिक्षक *श्री. बी.एस. शिंदे, श्री. मयूर भोसले श्री.संभाजी पवार,श्री.चंद्रकांत डुचे श्री.संभाजी इंगळे व शाळेतील सर्व शिक्षकांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Back to top button