घोडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी लक्ष्मण भांगे तर उपाध्यक्ष चंद्रशेन आजबे

घोडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी लक्ष्मण भांगे तर उपाध्यक्ष चंद्रशेन आजबे
शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी पूर्ण वेळ देणार – लक्ष्मण भांगे
जामखेड प्रतिनिधी –तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे आज (दि२३) शाळा व्यवस्थापन समितीची निवड संवेदनशील वातावरणात पार पडली. अध्यक्ष पदी लक्ष्मण बलभीम भांगे तर उपाध्यक्ष पदी चंद्रशेन बाबासाहेब आजबे यांची १० विरुद्ध २ अशा प्रकारे निवड झाली.सुनिता रासकर,प्रतिभा भोंडवे,कदिर शेख, अश्विनी दिवटे, चंद्रकांत रासकर, उज्वला बडेकर,प्रज्ञा भोंडवे,धनेश कांबळे,संदिपान भोंडवे,फरहिन सय्यद यांची सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
या वेळी शरद जगताप सरपंच, अकबर शेख उपसरपंच, सेवक आडाल व्हा. चेअरमन, बाळासाहेब कांबळे माजी शा.व्य.स. अध्यक्ष, संदिपान भोंडवे माजी सरपंच, बाबासाहेब कांबळे माजी सरपंच,ग्रा. पं. सदस्य नारायण भोंडवे,बाबू भोंडवे,खंडू भोंडवे,महादेव भोंडवे शिक्षणप्रेमी, सचिन जगताप, बंकट भोंडवे, शंकर भोंडवे, इकबाल सय्यद, भिमराव भोंडवे, धनंजय भोंडवे, अक्षय धारूरकर, ईश्वर पाचारे, मुकुंद भोंडवे, श्रीकांत भोंडवे, गणेश नलवडे, चरण पाटील, राम भोंडवे, संतोष नलवडे, दत्ता म्हस्के, बाळु भांगे आदी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
निवड प्रक्रियेनंतर अध्यक्ष लक्ष्मण भांगे यांनी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी रुपये २१,००० जमा केले. तर उपाध्यक्षांनी रुपये १५,००० जमा केले. अध्यक्षांनी यापूर्वीही शाळेत रुपये १५,००० चे RO Filter व वर्गखोल्या बांधकामासाठी रोख रक्कम व श्रमदान केलेले आहे.
लक्ष्मण भांगे म्हणाले, शाळेचा शैक्षणिक गुणवत्ता स्तर उंचावण्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकसहभागातून भौतिक सुविधा पूर्ण करू तसेच मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमातून बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
मुख्याध्यापक अनिल यादव, उपाध्यापक संजय राऊत, पदवीधर संतोष पाटील, रिंकू ढेंगळे, प्राजक्ता घायतडक आदी शिक्षक उपस्थित होते.



