वादळी वाऱ्याने जांभूळ गावातील सरकारी आरोग्य उपकेंद्र व घरांचे नुकसान ग्रामस्थांची शासनाकडून मदतीची अपेक्षा

वादळी वाऱ्याने जांभूळ गावातील सरकारी आरोग्य उपकेंद्र व घरांचे नुकसान ग्रामस्थांची शासनाकडून मदतीची अपेक्षा
रायगड उपसंपादक: संतोष उध्दरकर.
म्हसळा: संपूर्ण महाराष्ट्रासह रायगडला पावसाने अगदी झोडपुन काढले असून काही ठिकाणी सकल भागात पाणी साचून काहींचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे पहायला मिळाले, यातच गेले चार पाच दिवस संपूर्ण म्हसळा तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाने धुमाकुळ घातला असून काल दुपारनंतर झालेल्या वादळी वारा पावसाने जांभूळ गावातील आरोग्य उपकेंद्राचे पत्रे उडाले तसेच बबन महाडिक यांच्या घरावर नारळाचे झाड पडुन कौले फुटली, महादेव कांबळे, हरिष जाधव, महेंद्र फटकरे यांच्या घराची कौले उडाली, तसेच जांभूळ बौध्दवाडी येथील काही घरांचे कौले, कोने, पत्रे उडुन मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असुन सरपंच व तलाठी यांनी घरांची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे.शासन दरबारी पंचनामा सादर करून लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
अचानक झालेल्या वादळी वारा पावसाने जांभूळ गावातील आरोग्य उपकेंद्रासह कुणबी वाडी, गौळवाडी, बौद्धवाडी येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पंचमाना देखील करण्यात आला असून शासनाकडुन आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी
( किरण मोरे, सरपंच, जांभुळ.)



