बीड
बीडचा सामान्य मतदार आमच्यासोबत, त्यामुळे विजयाची तुतारी वाजणारच – आ.संदीप क्षीरसागर

बीडचा सामान्य मतदार आमच्यासोबत, त्यामुळे विजयाची तुतारी वाजणारच – आ.संदीप क्षीरसागर
*मतदारांच्या प्रतिसादाने, कॉर्नर सभांना विराट सभेचे स्वरुप*
बीड दि.२९(प्रतिनिधी):- सातत्याने आम्ही लोकांच्या अडीअडचणी सोडवितो व लोकांच्या संपर्कात असतो. यामुळे सामान्य मतदार आमच्या सोबत असल्याने विजयाची तुतारी वाजणारच असे आ.संदीप क्षीरसागर यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे आणि प्रभाग क्रमांक १, ३, ४ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.२९) सायंकाळी शहरातील चक्रधर नगर, मातोश्री मंगल कार्यालय, विठ्ठल मंदिर चौक पेठ बीड येथे प्रचारार्थ आयोजित कॉर्नर बैठकांत प्रतिपादन केले. या सभेला मतदारांची आलोट गर्दी दिसून आल्याने बीड करांच ठरलं, तुतारी वाजणारच अशी चर्चा सुरू झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीच्या बीड नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे यांच्या व प्रभाग १ मध्ये बबीता सुधाकर जाधव, अशोक मारूती काळे यांच्या प्रचारार्थ चक्रधर नगर, प्रभाग ४ मध्ये भास्कर भारत कांबळे, मंगलाबाई संजय चांदणे यांच्या प्रचारार्थ मातोश्री मंगल कार्यालय, पेठ बीड आणि प्रभाग ३ मध्ये रवी जयमल्हार बागल, राधा आकाश घोरपडे यांच्या प्रचारार्थ विठ्ठल मंदिर चौक पेठ बीड येथे या तीन प्रभागाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. संदीप क्षीरसागर यांनी शनिवारी (दि.२९) सायंकाळी कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असल्याने बीडच्या मतदारांच्या मनात तुतारी अन् मशालच असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी बोलताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले की, मी आणि माजी आ.सय्यद सलीम आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरून काम करतो. लोकांच्या अडीअडचणी जाणतो, त्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे बीडचा सामान्य मतदार आमच्या सोबत आहे. त्यामुळे या नगरपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिताताई विष्णू वाघमारे यांच्यासह सर्व उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. सर्वसामान्य लोकांच्या आशिर्वादाने विजयाची तुतारी वाजणारच असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, राजेंद्र मस्के, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



