📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आदित्य महाविद्यालयात ‘स्वच्छता पंधरवडा’ भव्य रॅली अन् वृक्षारोपण

आदित्य महाविद्यालयात ‘स्वच्छता पंधरवडा’ भव्य रॅली अन् वृक्षारोपण
महाविद्यालयात ४३१ झाडांची लागवड; विद्यार्थ्यांकडून वृक्ष संगोपनाचा संकल्प
प्रतिनिधी | बीड
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) संयुक्त विद्यमाने आदित्य कृषी महाविद्यालय, बीड येथे ‘स्वच्छता पंधरवडा’ अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. अभियानांतर्गत परिसर स्वच्छता मोहीम, भव्य जनजागृती रॅली आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरात तब्बल ४३१ वृक्ष लागवड करण्यात आली. लावलेले वृक्ष विद्यार्थ्यांकडून संगोपनाचा संकल्प करण्यात आला.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत परिसर तसेच परिसरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. यानंतर विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिक मुक्ती आणि जलसंरक्षणाचे संदेश देणारे फलक घेऊन भव्य जनजागृती रॅली काढली. या रॅलीद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. या मोहिमेचा मुख्य भाग म्हणून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने अभियानादरम्यान एकूण ४३१ झाडांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी केवळ झाडे लावली नाहीत, तर त्यांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याची शपथही घेतली. हा उपक्रम आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा आणि संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्याम भुतडा यांच्या उत्तम नियोजनामुळे संपूर्ण पंधरवड्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

परभणी कृषी विद्यापीठाकडून विशेष अभिनंदन
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर, प्रा. वैशाली मिसाळ, डॉ. निर्मला ठोके, प्रा. सातपुते, प्रा. राऊत आणि प्रा. धावणे यांनी परिश्रम घेतले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) चे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आणि क्रीडा अधिकारी डॉ. शृंगारे यांनी महाविद्यालयाच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
Back to top button