📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

महिलांच्या कलागुणांना मिळाली संधी जयभिम महोत्सवात विविध स्पर्धा उत्साहात

महिलांच्या कलागुणांना मिळाली संधी
जयभिम महोत्सवात विविध स्पर्धा उत्साहात
बीड/प्रतिनिधी
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे, मंगळवार (दि.8) रोजी महिलांच्या विविध स्पर्धा पार पडल्या.त्या स्पर्धांना महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
     बीड येथील सामाजिक न्याय भवन येथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने 4 ते 14 एप्रिल या कालावधीत जयभिम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या जयभिम महोत्सवात महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महापुरुष वेशभूषा, रांगोळी, संगीत खुर्ची आदी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. महिला स्पर्धा समितीच्या प्रमुख तथा आयोजक अरुणाताई आठवले यांच्या उपस्थितीत सदरील स्पर्धा पार पडलेल्या आहेत. यावेळी विचार मंचावर अध्यक्ष म्हणून शैलजा ओव्हाळ, प्रमुख पाहुणे दीपा रोडे, मायाताई मिसळे, संगीता वाघमारे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  माया तेलंग, सूत्रसंचालन प्रा.पांडुरंग सुतार, आभार वैशाली चपोडे-जोगदंड यांनी केले. दरम्यान जयभिम महोत्सवात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांना जनतेने उपस्थित राहावे. असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांनी केले आहे.
—-
आज होणार असे कार्यक्रम
जयभिम महोत्सवात गुरुवार (दि.10) रोजी सकाळी 11 ते 5  यावेळेत भव्य नृत्य स्पर्धा होणार आहेत.ही स्पर्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे होणार आहे.

Back to top button