📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पाटोदा येथील महाशिबिरात वाहतूक शाखेने वाहतूक नियमा बाबत जनतेची केली जनजागृती-डॉ संजय तांदळे                 

पाटोदा येथील महाशिबिरात वाहतूक शाखेने वाहतूक नियमा बाबत जनतेची केली जनजागृती-डॉ संजय तांदळे
पाटोदा (प्रतिनिधी ) : पाटोदा येथे 18 जानेवारी 2026 रविवार रोजीआयोजित राष्ट्रीय विधी सेवा महाशिवरात बीड जिल्हा वाहतूक शाखेने स्टॉल लावून स्टॉलला भेट देणाऱ्या नागरिकांना वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती केली तसेच विविध यंत्रे स्टॉलवर ठेवून ते कसे काम करतात याबाबत सविस्तर नागरिकांना माहिती दिली. यामुळे या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्राचे विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण बीड व जिल्हा प्रशासन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने पाटोदा येथील वसंत दादा पाटील महाविद्यालय  येथे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी महा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत,  अप्पर पोलीस अधीक्षक सचीन पाडंकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा वाहतूक शाखेने ही आपला एक स्टॉल महाशिबीरात लावला होता. या स्टॉलला सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त पत्रकार डॉ. संजय तांदळे यांनी भेट दिली असता जनजागृती बाबतची माहिती जाणून घेतली तसेच अनेक नागरिकांनी देखील भेटी दिल्या. यावेळी येथील नियुक्त कर्मचाऱ्यांनी वाहतुकीचे नियम सांगून जनजागृती केली. वाहतूक नियमांचे पुस्तक देखील नागरिकांना वाटप करण्यात आले. तसेच ब्रेक आणलायझर मशीन सह विविध मशीन कसे कार्य करतात याची देखील नागरिकांना माहिती दिली. स्टॉलवर वाहतूक शाखेचे प्रभारी सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर,पोलीस हवालदार विष्णू काकडे, अजिनाथ मुंडे पोलीस हवालदार चालक संतोष हरके आदींची उपस्थिती होती.zz
Back to top button