📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सिद्धेश शिंदे नवोदयसाठी पात्र – बुद्धीमत्तेने नावाप्रमाणे सिद्ध केले यश!

सिद्धेश शिंदे नवोदयसाठी पात्र – बुद्धीमत्तेने नावाप्रमाणे सिद्ध केले यश!

जामखेड, प्रतिनिधी:-“बुध्दीमत्ता ही कोणाचीही मक्तेदारी नसते, ती जिद्द आणि मेहनतीने सिद्ध करता येते,” हे पुन्हा एकदा खरे ठरले आहे. जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जवळके ,केंद्र सोनेगांव शाळेच्या सिद्धेश सचिन शिंदे याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२४-२५ मध्ये घवघवीत यश मिळवत आपले नाव उज्ज्वल केले आहे.

अतिशय सामान्य कुटुंबातील असलेल्या सिद्धेशच्या वडिलांचा व्यवसाय ड्रायव्हर असून, आर्थिक परिस्थिती मर्यादित आहे. मात्र, जिद्द, मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर त्याने नवोदय परीक्षेत यश संपादन केले.

सिद्धेशच्या या यशामागे वर्गशिक्षक बापुराव हजारे सर यांचे मोलाचे योगदान असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावविश्वात जाऊन केलेल्या अध्यापनामुळे त्याने स्वतःला सिद्ध केले.

त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, मुख्याध्यापक दत्तात्रय कोल्हे आदींनी
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धेश शिंदे याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

*चौकट*
” यश मिळवण्यासाठी श्रीमंती नव्हे, तर जिद्द आणि मेहनत महत्वाची असते.हे पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जवळके येथील सिध्देश सचिन शिंदे या विद्यार्थ्यांने सिद्ध केले आहे.

Back to top button