बीड

ना. पंकजाताई मुंडेंची पिंपरी चिंचवड मध्ये विशाल जनसभा ; वातावरण झाले ‘कमळमय’

ना. पंकजाताई मुंडेंची पिंपरी चिंचवड मध्ये विशाल जनसभा ; वातावरण झाले ‘कमळमय’

*पिंपरी-चिंचवडचा विकास करण्याची धमक फक्त भाजपमध्येच ; सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे केले आवाहन*

पुणे ।दिनांक ०९।
पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद  फक्त भाजपमध्येच आहे, त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य आणि विकासाला झुकते माप देणाऱ्या भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करा असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज झंझावाती प्रचार सभेत केले.

​पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विमल गार्डन रहाटणी व मोहननगर पिंपरी येथे  भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या ‘विशाल जनसभेत त्या बोलत होत्या.आ. शंकर जगताप, आ. उमा खापरे, जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे,  प्रा.सदाशिव खाडे, केशव घोळवे, दीपक नागरगोजे, सुभाष दराडे, आण्णा गर्जे, अनिल नखाते, विनोद तापकीर, नरेश आप्पा खुळे, संदीप काटे, गणेश नखाते, शत्रुघ्न खाडे, संजय भिसे यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना ना.पंकजाताई म्हणाल्या,देशाचा ​पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. विकास हाच आमचा अजेंडा आहे. लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छिते की, अफवांवर विश्वास ठेवू नका, देवाभाऊ ही योजना बंद होऊ देणार नाहीत.  विकासाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी येत्या १५ तारखेला भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा ठाम विश्वास या सभेत व्यक्त केला.

*सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती*
—–
या दोन्ही सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेला देखील मोठा जनसमुदाय होता. ना. पंकजाताईंचे स्वागत करण्यासाठी हेलिपॅडवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

Back to top button