रत्नागिरी
मंडणगड हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम विषयी मार्गदर्शन पो.नि. नितिन गवारे

मंडणगड हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम विषयी मार्गदर्शन पो.नि. नितिन गवारे
मंडणगड प्रतिनिधी
दिनांक 26/06/2025 रोजी अमली पदार्थ दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व जुनिअर कॉलेज मंडणगड व लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालय मंडणगड या ठिकाणी कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम व त्यातून समाजावर आणि युवकावर होणारा परिणाम तसेच अमली पदार्थ बाबत असणाऱ्या कायद्यांची माहिती व कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यातून होणारी शिक्षा व त्याचा आपल्या भविष्यावर होणारा परिणाम विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इतर कायद्यांची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली .त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थी यांच्या समवेत अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शपथ देखील घेण्यात आली.



