बीड

आरोग्य विभाग उपसंचालक डॉ.रेखा गायकवाड यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

आरोग्य विभाग उपसंचालक डॉ.रेखा गायकवाड यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

ना. मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते डॉ. गायकवाड आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानीत

बीड (प्रतिनिधी): स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या परिमंडळस्तरीय व जिल्हास्तरीय नोडल अधिकार्‍यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा लातूरच्या डॉ.रेखा गायकवाड यांनाही या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्या आहेत. ना. मेघना बोर्डीकर यांच्यासह इतर मान्यवर व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. राज्यामध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविणार्‍या संस्था, अधिकारी व कर्मचारी यांचा दरवर्षी शासना मार्फत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात येतो. दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 दरम्यान स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान राबविण्यात आले. अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हा व परिमंडळ स्तरावर एका महिला नोडल अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली होती. या अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या राज्यातील एका परिमंडळ स्तरीय नोडल अधिकार्‍याची आणि तीन जिल्हास्तरीय नोडल अधिकार्‍यांची कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात आला. यामध्ये लातूर परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालक डॉ.रेखा गायकवाड यांचाही काल सन्मान करण्यात आला आहे. डॉ. रेखा गायकवाड यांना उत्कृष्ट कार्याबद्दल मिळालेल्या पुरस्काराचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Back to top button