आदित्य पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची वॉलस्टार टेक्नॉलॉजी येथे औद्योगिक भेट

आदित्य पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची वॉलस्टार टेक्नॉलॉजी येथे औद्योगिक भेट
—-
आयटी उद्योगातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव; आदित्य पॉलिटेक्निक व वॉलस्टार टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार
प्रतिनिधी | बीड
आदित्य शिक्षण संस्थेच्या आदित्य पॉलिटेक्निक बीड येथील कंप्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी 17 जानेवारी 2026 रोजी वॉलस्टार टेक्नॉलॉजी प्रा.ली., कोल्हापूर या नामांकित आयटी सॉफ्टवेअर कंपनीस औद्योगिक भेट दिली. या भेटीत ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना आयटी उद्योगातील प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली. या भेटीचे आदित्य पॉलिटेक्निक व वॉलस्टार टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार झाल्याने विद्यार्थांना याचा मोठा फायदा होणार आहे.
संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ.आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रोजेक्ट डेव्हलपमेंटची प्रक्रिया आणि व्यावसायिक वातावरणाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. वेब व मोबाईल ॲप्लिकेशन तयार करताना कोणत्या टप्प्यांतून काम केले जाते, टीमवर्क कसे असते आणि ग्राहकांच्या गरजेनुसार सोल्युशन कसे विकसित केले जाते, याची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे समजावून सांगण्यात आली.
या भेटीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आदित्य पॉलिटेक्निक, बीड आणि वॉलस्टार टेक्नॉलॉजी प्रा.ली., कोल्हापूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, कार्यशाळा, औद्योगिक प्रकल्प आणि प्रॅक्टिकल आधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
वॉलस्टार टेक्नॉलॉजीच्या बिझनेस डेव्हलपमेंट टीमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सॉफ्टवेअर क्षेत्रातील करिअर संधी, आवश्यक कौशल्ये, सायबर सिक्युरिटीचे महत्त्व, स्टार्टअप कंपन्यांमधील संधी तसेच भविष्यातील तंत्रज्ञान ट्रेंड्स याबाबत सविस्तर माहिती दिली. कंपनीच्या वर्किंग स्ट्रक्चरची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना आयटी उद्योगातील कार्यसंस्कृती समजण्यास मदत झाली.
या औद्योगिक भेटीबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून, या अनुभवामुळे भविष्यातील करिअरसाठी योग्य दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आदित्य पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. राहुल खडके यांच्या मार्गदर्शनामुळे ही औद्योगिक भेट यशस्वीरित्या पार पडली.यावेळी विभाग प्रमुख सलीम शेख , प्रा. अंकुर कांबळे, प्रा. सूरज शिंदे, प्रा. मुस्कान पठाण मॅडम, प्रा. पूजा जाधव मॅडम, प्रा. शिवानी जाधव मॅडम, प्रा. मिन्हाज शेख मॅडम यांची उपस्थिती होती.
—–
विद्यार्थ्यांनी काय जाणून घेतले
वेब डेव्हलपमेंट व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रत्यक्ष प्रक्रिया
मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटचे टप्पे
UI/UX डिझाइनचे महत्त्व
आर्टिफिशियल इंटेलिजन्स व फुल स्टॅक डेव्हलपमेंटची ओळख
डिजिटल मार्केटिंगमधील आधुनिक पद्धती
—
औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना झालेले शैक्षणिक फायदे
—-
अभ्यासक्रमातील ज्ञान आणि उद्योगातील प्रत्यक्ष कामकाजातील फरक समजला
आयटी क्षेत्रातील करिअर संधींची स्पष्ट दिशा मिळाली
प्रॅक्टिकल कौशल्यांचे महत्त्व लक्षात आले
इंटर्नशिप व प्रोजेक्ट संधी उपलब्ध होण्याचा मार्ग खुला झाला
भविष्यातील नोकरी व उद्योजकतेसाठी आत्मविश्वास वाढला



